शेतकरी विरोधी कायदे रद्द करा :रघुनाथदादा पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2020 04:09 AM2020-12-09T04:09:24+5:302020-12-09T04:09:24+5:30

शेतकरी संघटनेच्या जनप्रबोधन रघुनाथदादा पाटील बोलत होते. शेतकरी हितासाठी, शेतकऱ्यांचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी व शासनाचे लक्ष वेधण्यासाठी या जनप्रबोधन ...

Cancel anti-farmer laws: Raghunathdada Patil | शेतकरी विरोधी कायदे रद्द करा :रघुनाथदादा पाटील

शेतकरी विरोधी कायदे रद्द करा :रघुनाथदादा पाटील

Next

शेतकरी संघटनेच्या जनप्रबोधन रघुनाथदादा पाटील बोलत होते.

शेतकरी हितासाठी, शेतकऱ्यांचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी व शासनाचे लक्ष वेधण्यासाठी या जनप्रबोधन यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. २८ नोव्हेंबर ते १२डिसेंबर दरम्यान या जनप्रबोधन यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी येथे ही यात्रा मंगळवारी दाखल झाली. या ठिकाणी उपस्थित शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत केले. जनप्रबोधन यात्रे मागचा उद्देश सर्व शेतकऱ्यांना सर्व कर्जातून व वीजबिलातून मुक्त करा, दोन साखर कारखान्यामधील अंतराची अट रद्द करा, शेतकऱ्यांना बाजाराचे व तंत्रज्ञानाचे स्वातंत्र्य द्या, शेतकरी विरोधी कायदे रद्द करा, शेतकऱ्यांना गाईच्या दुधाला ४० रुपये व म्हशीच्या दुधाला ६० रुपये भाव मिळाला पाहिजे, उसाला प्रति टन पहिला हप्ता एकरक्कमी एफ. आर. पी. इतका व अंतिम भाव ४००० रुपये मिळाला पाहिजे. या मागणीसह ही जनप्रबोधन यात्रा सुरु आहे.

बाहेरील राज्य ऊस उत्पादकांना चार हजार रुपये प्रति टन भाव देत असेल तर महाराष्ट्रातील कारखान्यांना चार हजार रुपये भाव का देऊ नये यासह व शेतकऱ्यांच्या इतर प्रश्नासह रघुनाथ दादा पाटील हे जनजागृती करत आहेत. यावेळी शिवाजी नांदखिले यांनी सांगितले की आमची संघटना भारत बंद मध्ये सामिल नाही. यावेळी पुणे जिल्हा अध्यक्ष शिवाजी नांदखिले, तानाजी बेनके, अंबादास हांडे, अजित वाघ, लक्ष्मण शिंदे व तालुका अध्यक्ष संजय भुजबळ यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

फोटो - पिंपळवंडी(ता. जुन्नर)या ठिकाणी दाखल झालेल्या जन प्रबोधन यात्रेच्या मेळाव्यात बोलताना रघुनाथ दादा पाटील.

Web Title: Cancel anti-farmer laws: Raghunathdada Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.