राजकीय दबावापोटी केलेली बदली रद्द करा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2019 12:39 AM2019-03-03T00:39:07+5:302019-03-03T00:39:14+5:30

यवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सूरज बंडगर यांची बदली दौंडच्या लोकप्रतिनिधींच्या राजकीय दबावामुळे झाली आहे.

Cancel the change made by political press | राजकीय दबावापोटी केलेली बदली रद्द करा

राजकीय दबावापोटी केलेली बदली रद्द करा

googlenewsNext

यवत : यवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सूरज बंडगर यांची बदली दौंडच्या लोकप्रतिनिधींच्या राजकीय दबावामुळे झाली आहे. ती तत्काळ रद्द करावी; अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा पुणे जिल्हा बँकेचे अध्यक्ष आणि माजी आमदार रमेश थोरात यांनी दिला आहे.
बंडगर यांची बदली रद्द करण्याच्या मागणीसाठी दौंड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने यवत पोलीस ठाण्यासमोर शनिवारी सकाळी दहाच्या सुमारास महामार्गाच्या सेवा रस्त्यावर जाहीर सभा घेण्यात आली. त्या वेळी ते बोलत होते. थोरात म्हणाले की, दौंडचे आमदार मुख्यमंत्र्यांच्या गळ्यातील ताईत आहेत.
दौंडच्या लोकप्रतिनिधींचे ऐकत नाही म्हणून मुख्यमंत्र्यांनी स्वत: विशेष लक्ष घालून पोलीस निरीक्षक सूरज बंडगर यांची बदली केली. त्यामुळे धनगर बांधव प्रश्न विचारत आहेत की, बंडगरसाहेब धनगर असल्याने त्यांची बदली केली.मात्र हा प्रश्न त्यांनीच आमदारांना विचार, असा सल्ला देत असल्याचे थोरात यांनी यावेळी सांगितले. या प्रसंगी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष अप्पासाहेब पवार, पंचायत समिती सदस्य नितीन दोरगे, कुंडलिक खुटवड, महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुका अध्यक्ष योगिनी दिवेकर, लक्ष्मण दिवेकर, दौलत ठोंबरे भानुदास नेवसे, अशोक होले, एम. जी. शेलार, सभापती राणी शेळके, सागर फडके, सारिक पानसरे, संभाजी ताकवणे, सदानंद दोरगे, समीर दोरगे, इम्रान तांबोळी, भास्कर देवकर, भानुदास देशमुख , भाऊसाहेब ढमढेरे , झुंबर गायकवाड , विक्रात गायकवाड, रामभाऊ चौधरी, अजित शितोळे, वैशाली दघाटे व इतर मान्यवर उपस्थित होते.
>विनंती केल्यानेच माझी बदली
यवत पोलीस ठाण्यात मी मागील काही महिन्यांपासून प्रभारी अधिकारी म्हणून कामकाज पाहिले.मात्र, माझी तेथून बदली व्हावी यासाठी मी स्वत: पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांच्याकडे मागणी केली होती.यामुळे माझी बदली लोणी काळभोर पोलीस ठाण्यात झाली, अशी माहिती सूरज बंडगर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

Web Title: Cancel the change made by political press

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.