सचिन वाळूंज यांचे पोलीस पाटील पद रद्द करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 04:09 AM2021-03-25T04:09:59+5:302021-03-25T04:09:59+5:30
सचिन वाळूंज हे ग्रामपंचायत वरची भांबुरवाडी व ग्रामपंचायत तुकाईवाडी या दोन्ही गावांचा पोलीस पाटील म्हणून कारभार पाहत आहे. या ...
सचिन वाळूंज हे ग्रामपंचायत वरची भांबुरवाडी व ग्रामपंचायत तुकाईवाडी या दोन्ही गावांचा पोलीस पाटील म्हणून कारभार पाहत आहे. या दोन्ही गावांचा महसूल वेगळा आहे. वाळूंज हे पदाचा गैरवापर करून राजकीय हस्तक्षेप करणे, गावामधील वस्त्यांमध्ये दोन गटांत भांडणे लावून देण्याचे काम करीत आहे. गाव निवडणुकीच्या वेळी सहभाग घेणे, वाड्या-वस्त्यांवरील काही तरुणांना हाताशी धरून गावात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणे, तसेच विकासकामांत अडथळा निर्माण अशा प्रकारे पदाचा गैरवापर वाळूंज करीत आहे. त्यामुळे त्यांचे पोलीस पाटील पद तत्काळ रद्द न झाल्यास खेड पोलीस ठाण्यासमोर सर्व ग्रामस्थ सामूहिक आत्मदहन करू, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. निरपेक्ष व्यक्तीस पोलीस पाटील म्हणून नियुक्त करावे अशी मागणी सरपंच विजय थिगळे, उपसरपंच नीता ढोरे,सदस्य अनिता राक्षे, किशोर रोडे, माजी उपसरपंच संपत वेहळे , ग्रामस्थ शांताराम राक्षे, सुलाभ वेहळे,सुरेखा थिगळे, अलका राक्षे यांच्यासह ग्रामस्थांनी केली आहे.
स्थानिक पातळीवर आरोप करणाऱ्यांचे अवैध उत्खनन व्यवसाय माझ्यामुळे थांबले. त्यामुळे माझ्या विरोधात षडयंत्र केले आहे. मी पोलीस पाटील पदावर रुजू होण्यापूर्वीपासून माझी पत्नी स्थानिक राजकारणात आहे. त्या माजी सरपंच आणि सध्या सदस्य आहेत. विरोधकांनी आरोप सिद्ध करावेत.
सचिन वाळुंज, पोलीस पाटील, वरची भांबुरवाडी
२४ राजगुरुनगर
सध्या असलेल्या पोलीस पाटील यांचे पद रद्द करण्याच्या मागणीचे निवेदन प्रांताधिकारी कार्यालयात देताना वरची भांबुरवाडीचे सरपंच विजय थिगळे व ग्रामस्थ.