केबल डक्ट टाकण्याचे काम रद्द; १९५ कोटी वाचणार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2019 11:31 AM2019-11-29T11:31:56+5:302019-11-29T11:39:35+5:30
तिजोरीतून खर्च होणारे तब्बल १९५ कोटी ६६ लाख रुपये वाचणार
नीलेश राऊत -
पुणे : पुणे शहरासाठी समान पाणीपुरवठा प्रकल्पांतर्गत (२४ बाय ७ योजना) शहरात टाकण्यात येणाºया पाइपलाइनसोबतच, प्रस्तावित असलेल्या १ हजार ४६३ किलोमीटर अंतराचे आॅप्टिकल फायबर केबल डक्ट टाकण्याचे काम रद्द करण्याबाबतचा निर्णय प्रशासनाने (अंमलबजावणी यंत्रणेने) घेतला आहे़. त्यामुळे या कामांवर पालिकेच्या तिजोरीतून खर्च होणारे तब्बल १९५ कोटी ६६ लाख रुपये वाचणार आहेत़.
एखाद्या प्रकल्पातील अनावश्यक काम टाळावे, त्याचा काही उपयोग होणार नाही़. या जागरूकतेतून पुणेकरांचे कररूपी शेकडो कोटी रूपये वाचविण्यासाठी, ‘पालिका प्रशासनच’ पुढे आल्याची प्रचिती कधी नव्हे ती यातून आली आहे़. केबल डक्ट रद्द करण्याचा प्रस्ताव लवकरच प्रशासनाकडून पालिकेच्या मुख्य सभेपुढे मांडण्यात येणार आहे़. त्यामुळे पुणेकरांच्या कोट्यवधी रूपये बचतीच्या या प्रस्तावावर सभागृहात लोकप्रतिनिधी एकमताने व किती तत्परतेने मान्यता देतात का हे दिसणार आहे़.
समान पाणीपुरवठा प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी २३ फेब्रुवारी, २०१८ रोजी प्रशासनाकडून आदेश देण्यात आले़ यामध्ये प्रकल्पांतर्गत पाइपलाइनच्या कामाबरोबरच १९५ कोटी ६६ लाख रूपये खर्चाची व १ हजार ४६३ किलोमीटर अंतराची ऑप्टीकल फायबर केबल डक्ट टाकण्याच्या कामाचाही समावेश होता़. या कामाच्या अंमलबजावणीसाठी संबंधित ठेकेदारांमार्फत अस्तित्वातील पाण्याच्या लाईनचे सर्वेक्षण करण्यात आले़. त्यानुसार पुणे शहरात १४१ पाणीपुरवठा भाग करण्यात आले़. यामध्ये सुस्थितीत असलेल्या जुन्या पाइपलाइन कायम ठेवून, खराब असलेल्या पाइपलाइन बदलण्याचे नियोजन केले गेले़. तसेच ही पाइपलाइन मुख्य रस्त्याबरोबरच शहरातील गल्लीबोळातही गेली असल्याने, एकूण १ हजार ५५० किमीच्या या पाइपलाइनमध्ये केवळ ५० टक्केच नवीन पाइपलाइन टाकण्यात येणार आहे़. परिणामी, प्रकल्पात समाविष्ट केलेल्या केबल डक्टचे काम नवीन पाइपलाइनकरिता वेळीच शक्य होणार असल्याचे निदर्शनास आले व हे डक्ट उभारले तरी त्याला सलगता राहणार नाही.
तसेच त्याचा काहीही उपयोग होणार नाही हे ठेकेदाराने सादर केलेल्या डिझाइनमधून स्पष्ट झाले़. त्यातच सलगता नसल्याने कुठलीही खासगी कंपनी आपल्या केबल टाकण्यासाठी या डक्टची मागणी करणार नाही हे निश्चित असल्याने कोट्यवधी रुपयांच्या या केबल डक्ट टाकण्याचे काम रद्द करावे, असे प्रशासनाचे म्हणणे आहे़. आजपर्यंत या प्रकल्पांतर्गत शहरात टाकण्यात आलेल्या सुमारे ११० किमी़ अंतराच्या पाइपलाइनसोबत एक मीटरही डक्टचे काम करण्यात आलेले नाही़. परिणामी, या कामापोटी अदा करण्यात येणाºया १९५ कोटी रुपयांपैकी एक रुपयाही ठेकेदाराला देण्यात आलेला नाही,अशी माहिती पाणीपुरवठा प्रकल्प अंमलबजावणी यंत्रणेने लोकमतला दिली़.
........
काय आहकाय आहेत हे डक्ट
खासगी कंपन्यांना आपल्या केबल टाकण्यासाठी महापालिका भाडे आकारून रस्त्याच्या बाजूने सलग खोदाईस परवानगी देते़ . परंतु, पाणीपुरवठा योजनेतील जलवाहिनीसोबतच या डक्टच्या माध्यमातून केबल टाकण्यासाठी दहा इंच व्यासाचे आरसीसी पाईप टाकण्यात येणार होते़ या पाइपमध्ये दीड इंच व्यासाचे चार एचडीपीई पाइप खासगी कंपन्यांना विहित शुल्क आकारून उपलब्ध करून देण्याचे नियोजन होते़. मात्र सद्यस्थितीला जवाहरलाल नेहरू योजनेंतर्गत शहरात यापूर्वी रस्त्यांसोबतच बांधण्यात आलेल्या अशा प्रकारच्या डक्टचा वापर झालेला नाही़. खासगी कंपन्यांनी या डक्टद्वारे केबल टाकण्यास पसंती न दिल्याने यावरील कोट्यवधी रुपयांचा खर्च वाया गेलेला आहे़.
......
समान पाणीपुरवठा प्रकल्पात १ हजार ५५० किमीअंतराची पाइपलाइन टाकण्यात येणार आहे़. मात्र, यामध्ये ५० टक्के पाइपलाइन (जलवाहिन्या) या जुन्याच आहेत़. त्यामुळे यात कुठेही नवीन पाइपलाइनमध्ये सलगता नाही़. त्यामुळे तुकड्या-तुकड्यामध्ये ऑप्टिकल फायबर केबल डक्ट टाकता येणार नाही व त्याचा काहीही उपयोगही होणार नाही़- नंदकुमार जगताप, अधीक्षक अभियंता, समान पाणीपुरवठा प्रकल्प, मनपा़ेत्
...........
ा हे डक्ट
खासगी कंपन्यांना आपल्या केबल टाकण्यासाठी महापालिका भाडे आकारून रस्त्याच्या बाजूने सलग खोदाईस परवानगी देते़ परंतु पाणीपुरवठा योजनेतील जलवाहिनीसोबतच या डक्टच्या माध्यमातून केबल टाकण्यासाठी दहा इंच व्यासाचे आरसीसी पाईप टाकण्यात येणार होते़ या पाइपमध्ये दीड इंच व्यासाचे चार एचडीपीई पाइप खासगी कंपन्यांना विहित शुल्क आकारून उपलब्ध करून देण्याचे नियोजन होते़ मात्र सद्यस्थितीला जवाहरलाल नेहरू योजनेंतर्गत शहरात यापूर्वी रस्त्यांसोबतच बांधण्यात आलेल्या अशा प्रकारच्या डक्टचा वापर झालेला नाही़ खासगी कंपन्यांनी या डक्टद्वारे केबल टाकण्यास पसंती न दिल्याने यावरील कोट्यवधी रुपयांचा खर्च वाया गेलेला आहे़