मराठा आरक्षण रद्द होणे हे महाविकास आघाडीचेच अपयश : जगदीश मुळीक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:11 AM2021-05-06T04:11:38+5:302021-05-06T04:11:38+5:30
पुणे : मराठा आरक्षणाचा विषय सर्वोच्च न्यायालयात गेल्यावर याठिकाणी महाविकास आघाडी सरकारने सरकारची बाजू ठामपणे मांडली नाही़; तसेच मराठा ...
पुणे : मराठा आरक्षणाचा विषय सर्वोच्च न्यायालयात गेल्यावर याठिकाणी महाविकास आघाडी सरकारने सरकारची बाजू ठामपणे मांडली नाही़; तसेच मराठा आरक्षणाबाबतही ठोस भूमिका घेऊन त्याबाबतची बाजू व्यवस्थित मांडली नाही. मराठा आरक्षण रद्द होणे हे केवळ महाविकास आघाडी सरकारचे अपयश आहे, असा आरोप भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी केला.
मुळीक म्हणाले, देवेंद्र फडणवीस सरकारने जे मराठा समाजासाठी आरक्षण दिले होते ते अत्यंत अभ्यासपूर्ण व सर्व विचार करून दिले होते. मराठा समाजाला दिलेले आरक्षण कायम राहील याची त्यांनी काळजी घेतली होती. त्यामुळेच राज्याच्या उच्च न्यायालयातही हे आरक्षण कायम राहिले; पण सर्वोच्च न्यायालयात हे प्रकरण गेल्यानंतर महाविकास आघाडीने त्यामध्ये लक्ष दिले नाही. त्यामुळे हे आरक्षण न्यायालयात टिकले नसून, हे पूर्णपणे राज्य सरकारचे अपयश आहे.