पास दरवाढ रद्द करा, पीएमपी प्रवासी मंच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2018 02:26 AM2018-02-24T02:26:32+5:302018-02-24T02:26:32+5:30
ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी व इतर बस पासदरात करण्यात आलेली बेकायदा वाढ रद्द करावी, अशी मागणी पीएमपी प्रवासी मंचतर्फे पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या अध्यक्ष
पुणे : ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी व इतर बस पासदरात करण्यात आलेली बेकायदा वाढ रद्द करावी, अशी मागणी पीएमपी प्रवासी मंचतर्फे पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक नयना गुंडे यांच्याकडे करण्यात आली. गुंडे यांना नागरिकांच्या १५ हजार सह्यांचे निवेदन देण्यात आले.
बसपास दरवाढीविरोधात मंचच्या वतीने शहरातील विविध बसस्थानकावर स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली होती. पीएमपीचे तत्कालीन अध्यक्ष तुकाराम मुंढे यांनी मंचच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले होते. त्यामुळे मंचच्या वतीने शुक्रवारी गुंडे यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन देण्यात आले. मंचाचे अध्यक्ष जुगल राठी, सचिव संजय शितोळे, सहसचिव सतीश चितळे, जयदीप साठे, नीलकंठ मांढरे, आम
आदमी पक्षाचे किशोर मुजुमदार, एस. एम. अली, सतीश यादव या वेळी उपस्थित होते.
बसपास दरवाढीनंतर पासधारकांची संख्या कमी झाली आहे. पुण्यातील पीएमपी व्यवस्था सक्षम होण्यासाठी माझा प्रयत्न असेल. पीएमपीची आताची स्थिती काय आहे, याचा अभ्यास करून आणि प्रवाशांना केंद्रबिंदू ठेवून प्रवासी मंचाचे सहकार्य घेत एकत्रित काम करू, असे आश्वासन गुंडे यांनी दिल्याची माहिती मंचतर्फे देण्यात आली.