पत्नीच्या वर्षश्राद्धाचा कार्यक्रम रद्द करत कोरोनाविरुद्धच्या लढाईत त्यांनी दिले ' एक लाख ११ हजार एकशे अकरा रुपये ' 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2020 03:00 PM2020-04-14T15:00:46+5:302020-04-14T15:01:40+5:30

पत्नीच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त खैरे यांनी सहकारनगर येथील एक कार्यालय आरक्षित केले होते.

Cancelling his wife's death anniversary programme, he gave one lakh 11 thousand one hundred eleven rupees | पत्नीच्या वर्षश्राद्धाचा कार्यक्रम रद्द करत कोरोनाविरुद्धच्या लढाईत त्यांनी दिले ' एक लाख ११ हजार एकशे अकरा रुपये ' 

पत्नीच्या वर्षश्राद्धाचा कार्यक्रम रद्द करत कोरोनाविरुद्धच्या लढाईत त्यांनी दिले ' एक लाख ११ हजार एकशे अकरा रुपये ' 

Next

पुणे : धनकवडी परिसरातील तळजाई पठार येथे राहणारे नंदकुमार विश्वनाथ खैरे यांच्या पत्नी जयश्री यांचे वर्षभरापूर्वी निधन झाले. पत्नीच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त खैरे यांनी सहकारनगर येथील एक कार्यालय आरक्षित केले होते. या ठिकाणी प्रथम पुण्यस्मरणाचे विधी आणि त्यानंतर एक हजार जणांना भोजन दिले जाणार होते. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊनची घोषणा केली.त्यांच्या पत्नीच्या पुण्यस्मरणानिमित्त होणारे विधी टाळून आर्थिक मदत करण्याचा निर्णय खैरे यांनी घेतला. या निर्णयाद्वारे समाजाला एक आदर्श निर्माण करून देण्याचा काम खैरे कुटुंबीयाने केले. 
 खैरे कुटुंबाचा फुले मंडईमध्ये खरेदी विक्रीचा जुना व्यवसाय होता. विश्वनाथ खैरे दलाल असोशियनचे अध्यक्ष असताना त्यांच्या मार्गदर्शनाने गुलटेकडी मार्केटयार्ड सुरू झाले व तेथे दलालीचा व्यवसाय सुरू आहे. गुलटेकडी मंडई येथील शारदा विनायकाची पहिली स्थापना पुजा नंदकुमार खैरे यांच्या हातून झाली. गुलटेकडी मार्केट सुरू होण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. तसेच पुणे सातारा रस्ता येथे हॉटेल विश्वकमल लॉज नावाने व्यवसाय सुरू केले. ते शिक्षण प्रसारक मंडळीचे सभासद आहेत. लग्नसंबंध जुळवणे, अडचणींमध्ये लोकांना मार्गदर्शन करणे अशा अनेक समाजकार्यात योगदान असते.त्यांनी वर्षश्राद्धाचा कार्यक्रमाचे सर्व नियोजन रद्द झाल्याने पत्नीच्या स्मरणार्थ देणगी देण्याचे ठरवले. त्याप्रमाणे तहसीलदार तृप्ती कोलते पाटील यांना संपर्क करून कळवले. त्यांच्या सांगण्यानुसार तहसीलदार शंकर ठुबे हे स्वत: घरी येऊन धनादेश घेऊन गेले व त्यामुळे  लॉकडाऊनमध्येही खैरे कुटुंबियांना मदत करता आली. लोकांनी उत्फुर्तपणे पुढाकार घेऊन कार्यक्रमाचे किमान नियोजन करून कोरोनाविरुद्धच्या लढ्याला आपापल्या परीने मुख्यमंत्रीनिधीला मदत करावी.निलेश हा नंदकुमार खैरे यांचा मुलगा असून तो विश्वकमल लॉजचे व्यवस्थापन पाहण्याबरोबर अनेक सामाजिक कार्यक्रम करत असतो.

Web Title: Cancelling his wife's death anniversary programme, he gave one lakh 11 thousand one hundred eleven rupees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.