कर्करोग प्रतिबंधक लसीकरण शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 04:11 AM2021-03-26T04:11:47+5:302021-03-26T04:11:47+5:30
महाराष्ट्र आरोग्य मंडळाच्या साने गुरुजी प्राथमिक विद्यामंदिर माळवाडी येथे ९ ते १३ गटात ४८ व १८ ते ...
महाराष्ट्र आरोग्य मंडळाच्या साने गुरुजी प्राथमिक विद्यामंदिर माळवाडी येथे ९ ते १३ गटात ४८ व १८ ते ४५ या गटात ४२९ वयोगटातील मुली व महिलांना गर्भाशय मुखाचा कर्करोग प्रतिबंधक लस देण्यात आली. महाराष्ट्र आरोग्य मंडळाचे, सेंटर फॉर एक्सलन्स फॉर मदर अॅन्ड चाइल्ड केअर व रोटरी क्लब पुणे सेंट्रल, रोटरी क्लब ऑफ लक्ष्मी रोड, रोटरी क्लब ऑफ पुणे मेट्रो यांच्या सहयोगाने हा उपक्रम झाला.
नगरसेविका हेमलता मगर यांच्या हस्ते व महाराष्ट्र आरोग्य मंडळाचे सचिव अनिल गुजर, रवि कपूर, दीपा भागवत, मकरंद फडके, डॉ. सुशीलकुमार देशमुख, डॉ. प्रणिता जोशी देशमुख, डॉ. मनीषा जगताप, डॉ. कमलाकर गजरे, मुख्याध्यापक सुरेश गुजर यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
लसीचा पहिला डोस या दिवशी देण्यात आला. एकूण ४७७ विद्यार्थिनी व महिलांनी लसीकरणाचा लाभ घेतला. लसीकरणाची कार्यवाही साने गुरुजी रुग्णालय व साने गुरुजी प्राथमिक विद्यामंदिरांतील स्वयंसेवकांनी केली. या लसीचा दुसरा डोस दोन महिन्यांनंतर देण्यात येणार आहे.