‘सप्तपर्णी’मुळे कर्करोग, ही अफवाच!

By Admin | Published: October 29, 2014 10:55 PM2014-10-29T22:55:32+5:302014-10-29T22:55:32+5:30

सुशोभीकरण आणि सावली देणारे झाड म्हणून सप्तपर्णी वृक्षाची लागवड सर्वत्र करण्यात आली आहे. या झाडामुळे कर्करोग होत असल्याची अफवा पसरत आहे.

Cancer, this rumor caused by 'Saptapurni' | ‘सप्तपर्णी’मुळे कर्करोग, ही अफवाच!

‘सप्तपर्णी’मुळे कर्करोग, ही अफवाच!

googlenewsNext
बारामती : सुशोभीकरण आणि सावली देणारे झाड म्हणून सप्तपर्णी वृक्षाची लागवड सर्वत्र करण्यात आली आहे. या झाडामुळे कर्करोग होत असल्याची अफवा पसरत आहे. वनस्पतितज्ज्ञांनी ही अफवाच असल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र, या झाडामुळे श्वसनाचे विकार जडण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. तर, हे झाड निरुपयोगी आहे, भविष्यात बारामती शहरात या झाडांची लागवड करू नये, अशी मागणी पर्यावरण संस्थांनी केली आहे.
सप्तपर्णी या वृक्षाची निवड करण्याचे कारण त्याची वाढ आहे. या वृक्षाच्या अवास्तव वाढीमुळेच त्याला ‘राक्षसीवीण’ही म्हटले जाते. त्यामुळेच या झाडाच्या लागवडीला रस्त्याच्या दुतर्फा, उद्याने आदी ठिकाणी प्राधान्य देण्यात आले आहे. बारामती शहरात त्यांची लागवड केल्याचे दिसून येते. 
वनस्पतितज्ज्ञ प्रा. डॉ. एच. एस. पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले, की सप्तपर्णीच्या झाडामुळे कर्करोगाचा कोणताही धोका नाही. हा निव्वळ गैरसमज आहे. याउलट, कर्करोगावरील उपचारांसाठी वापरण्यात येणा:या औषधांमध्ये या वनस्पतीचा वापर केला जातो.
शहरातील नेचर फ्रेंड्स ऑर्गनायङोशन या पर्यावरण संस्थेचे उपाध्यक्ष फय्याज शेख म्हणाले, की ऑक्टोबर महिन्यात या झाडाला फुले येतात. त्या फुलांमुळे डोकेदुखीचा 
त्रस होतो. 
आगामी काळात अशा  प्रकारची झाडे लावण्यात येऊ नयेत. ही झाडे काढायची असल्यास पर्यायी झाडांची लागवड, वाढ पूर्ण झाल्यानंतरच याबाबत विचार करण्यात यावा. या झाडावर कोणतेही पक्षी बसत 
नाहीत अथवा घरटेदेखील बांधत नाहीत. हे झाड तोडावे-न तोडावे, हा वेगळा प्रश्न आहे. मात्र, वृक्षांमुळे परिसर खुलतो. त्यामुळे वृक्षतोडीनंतर येणारा भकासपणा टाळण्यासाठी अगोदर दुस:या पर्यायी झाडाची व्यवस्था होणो तितकेच महत्त्वाचे आहे. या झाडांना फुले येण्याचा कालावधी केवळ 15 दिवसांचा आसतो; त्यामुळे ते फारसे नुकसानकारक नसावे. (प्रतिनिधी)
 
मात्र, फुप्फुसे, घ्राणोंद्रियाच्या श्वसनलिका बोथट होण्याचे काम या वनस्पतीच्या फुलांमधून येणारा उग्र वास करू शकतो. तसेच, या वनस्पतीचे परागकण, फुलांपासून निघणा:या दर्पामुळे श्वसनाचा त्रस होऊ शकतो. हा दर्प फार धोकादायक नाही. मात्र, तो आरोग्याला हितकारक नाही.
- प्रा. डॉ. एच. एस. पाटील, वनस्पतितज्ज्ञ 
 
4ऑक्टोबर हा सप्तपर्णीचा बहराचा काळ असतो. या काळात तिला फिकट पिवळ्या रंगाची फु ले येतात. 
4या फुलांच्या उग्र वासाचा वाहन चालवताना त्रस होत आहे. या उग्र वासाचे कारण या वृक्षामध्ये असणारे अल्कोलॉईडचे प्रमाण हे आहे. 

 

Web Title: Cancer, this rumor caused by 'Saptapurni'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.