कर्करोग बरा करणार ‘कळलावी कंद’!
By admin | Published: July 11, 2016 05:01 AM2016-07-11T05:01:17+5:302016-07-11T05:01:17+5:30
‘कळलावी’ ( ग्लोरिओसा सुपेरबा रूटस् ) या कंदामध्ये स्तनांचा कर्करोग (कॅन्सर) बरा करण्याची क्षमता असलेले घटक आढळले आहेत. मॉडर्न महाविद्यालयातील एमएस्सी मायक्रोबायोलॉजीच्या विद्यार्थीनींनी
राहुल शिंदे, पुणे
‘कळलावी’ ( ग्लोरिओसा सुपेरबा रूटस् ) या कंदामध्ये स्तनांचा कर्करोग (कॅन्सर) बरा करण्याची क्षमता असलेले घटक आढळले आहेत. मॉडर्न महाविद्यालयातील एमएस्सी मायक्रोबायोलॉजीच्या विद्यार्थीनींनी हे महत्त्वपूर्ण संशोधन केले असून आयआयटी मुंबई तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील इन्स्टिट्यूट आॅफ बायोइन्फॉर्मेटिक्स अॅण्ड बायोटेक्नॉलॉजी (आयबीबी) या संस्थांनी त्यावर शिक्कामोर्तब केले आहे. आता त्याचे पेटंट मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
गणेशखिंड येथील मॉर्डन महाविद्यालयाच्या एमएस्सीच्या द्वितीय वर्षाच्या मायक्रोबायोलॉजीच्या विद्यार्र्थिनींनी संशोधन प्रकल्पाचा अभ्यास करताना हा शोध लागला. महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ. सौगतो घोष यांनी जुन्नर येथून ग्लोरिओसा सुपेरबा रूटस् आणले. त्याला जुन्नर परिसरात कळलावी असे संबोधले जाते. घोष यांच्या मार्गदर्शनाखाली सोनल गुरव,अश्विनी हरके, आणि मलायकल जिनी चाक्को यांनी त्यातील घटकद्रव्यांचा अभ्यास केल्यानंतर ही गोष्ट उजेडात आली.
सोनल गुरव हिने सांगितले, की ग्लोरिओसा सुपेरबा रूटस्ला वाळवून आम्ही त्याची पावडर तयार केली. ही पावडर पाण्यात ऊकळल्यानंतर उरलेला अर्क आम्ही प्रयोगशाळेत तपासला. सिल्व्हर नायटे्रट आणि गोल्ड क्लोराईड बरोबर रिअॅक्ट्र केले. त्यानंतर २० मिनिटांत आम्हाला गोल्ड आणि सिल्वर नॉनोपार्टिकल्स आढळले. जे कर्करोग बरा करण्यासाठी उपयुक्त आहेत. आयआयटी मुंबई तसेच विद्यापीठातील आयबीबी संस्थेकडून खात्री करून घेतली.