उमेदवाराची 'कुंडली' दिसणार!

By Admin | Published: February 18, 2017 03:03 AM2017-02-18T03:03:19+5:302017-02-18T03:03:19+5:30

राज्य निवडणूक आयोगाने नव्याने दिलेल्या निर्देशानुसार निवडणुकीसाठी उभ्या असणाऱ्या उमेदवारांनी उमेदवारी अर्ज भरताना आयोगाकडे

Candidate 'horoscope' will appear! | उमेदवाराची 'कुंडली' दिसणार!

उमेदवाराची 'कुंडली' दिसणार!

googlenewsNext

बारामती : राज्य निवडणूक आयोगाने नव्याने दिलेल्या निर्देशानुसार निवडणुकीसाठी उभ्या असणाऱ्या उमेदवारांनी उमेदवारी अर्ज भरताना आयोगाकडे सादर केलेल्या शपथपत्राचा गोषवारा प्रत्येक मतदान केंद्राबाहेर फ्लेक्स स्वरूपात लावण्यात येणार आहे. यामुळे मतदानापूर्वी निवडणूक लढविणाऱ्या सर्व उमेदवारांची कुंडलीच मतदारांसमोर असणार आहे.
त्यामध्ये सर्व उमेदवारांची स्थावर, जंगम मालमत्ता, दायित्वे, शासकीय थकबाकी, त्यांच्यावर दाखल असणाऱ्या गुन्ह्यांची माहिती मतदारांना प्राप्त होणार आहे. या निर्णयाच्या अमंलबजावणीने मतदारांना उमेदवारांची सर्व माहिती मिळण्याचा मूलभूत हक्क प्राप्त झाला आहे. अधिकाधिक मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी उद्युक्त करण्यासाठी त्यांच्यामध्ये जनजागृती करावी या हेतूने जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून सर्व माध्यमांतून प्रसार केला जात आहे. व्हिडीओ क्लिप, आॅडिओ क्लिप, सोशल मीडिया, पत्रके यांच्याद्वारे मतदार जागृतीचे काम सुरू आहे.
जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपलेल्या असल्याने सर्वच प्रशासनाने कंबर कसली आहे. अवघ्या चार दिवसांत २७ लाख मतदान स्लीपा वाटण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे. त्यातच मतदानकेंद्रांची उभारणी करताना कायदा व सुव्यवस्था राखली जाऊन सर्व मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी सज्ज रहावे लागणार आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून आजपर्यंत स्टॅटॅस्टिक सर्व्हेलन्स टीमने शहरात विविध ठिकाणी १३ हजार ४७४ वाहनांची तपासणी केली आहे. व्हिडीओ शुटिंग पथकाने ७७ सीडींचे चित्रीकरण केले आहे. तसेच मतदारांसाठी निवडणूक मदत केंद्राचीही उभारणी करण्यात आली आहे. लोकशाही प्रक्रिया बळकट करण्यासाठी प्रशासनाच्यावतीने मतदार जागृती अभियानही प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. निवडणूक प्रक्रियेत प्रसारमाध्यमांची भूमिकाही अत्यंत महत्त्वाची असल्याने ही निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)

प्रभाव अथवा दबावातून सुटण्यासाठी...
४मतदान केंद्रावर जाताना अनेकदा मतदारांच्या मनात संभ्रम असतात. त्याचप्रमाणे विविध उमेदवारांनी प्रचार केल्यामुळे त्यांचा प्रभाव अथवा दबाव मतदारावर असू शकतो. पण अशा परिस्थितीमध्ये संभ्रमावस्थेत जाऊन मतदान करण्याऐवजी मतदारांना उमेदवारांने नक्की काय केले, त्याची कामगिरी काय व सांपत्तिक स्थिती काय हे लक्षात आल्यास निर्णय घेणे सोपे होऊ शकते.

व्हिडीओ सर्व्हेलन्स पथकांद्वारे वॉच
आचारसंहितेची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी स्वतंत्र आचारसंहिता कक्ष, फिरती पथके, स्थिर पथके, व्हिडीओ शुटींग करणारी पथके, जाहिरात प्रमाणिकरण कक्ष, पेड न्यूज कक्ष स्थापन करण्यात आले आहेत.

परवान्यांसाठी एक खिडकी
उमेदवारांना निवडणूकविषयी सर्व परवाने एकाच
ठिकाणी देण्यासाठी एक खिडकी योजना सुरू करण्यात आली आहे. याठिकाणी सर्व प्रकारचे परवाने देण्याचे
काम शीघ्रगतीने सुरू आहे.

 सर्व उमेदवारांची स्थावर, जंगम मालमत्ता, दायित्वे, शासकीय थकबाकी, त्यांच्यावर दाखल असणाऱ्या गुन्ह्यांची माहिती मतदारांना प्राप्त होणार आहे.
 या निर्णयाच्या अमंलबजावणीने मतदारांना उमेदवारांची सर्व माहिती मिळण्याचा मूलभूत हक्क प्राप्त

Web Title: Candidate 'horoscope' will appear!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.