दोन्ही पॅनेलचे उमेदवार व कार्यकर्ते चहा पिण्यासाठी एकत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 04:09 AM2021-01-17T04:09:55+5:302021-01-17T04:09:55+5:30

नळावणे गावात ९ पैकी २ जागा बिनविरोध झाल्या, तर ७ जागेसाठी मतदान शांततेत पार पडले. गावात दिवस अखेर ८५ ...

Candidates and activists of both the panels came together for tea | दोन्ही पॅनेलचे उमेदवार व कार्यकर्ते चहा पिण्यासाठी एकत्र

दोन्ही पॅनेलचे उमेदवार व कार्यकर्ते चहा पिण्यासाठी एकत्र

Next

नळावणे गावात ९ पैकी २ जागा बिनविरोध झाल्या, तर ७ जागेसाठी मतदान शांततेत पार पडले. गावात दिवस अखेर ८५ टक्के मतदान झाले. बाबाजी शिंदे व तुषार देशमुख यांच्या नेतृत्वाखाली कुलस्वामिनी खंडेराया ग्रामविकास पॅनेल, तर बाळासाहेब गगे व हौशीराम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कुलस्वामिनी खंडेराय परिवर्तन पॅनेल या दोन्ही पॅनेलचा प्रचार जोरदार झाला. तसेच दोन्ही पॅनेलचे कार्यकर्ते मतदान झाल्यानंतर सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास चहापाण्यासाठी एकत्र जमले होते. चहापाणी वेळी आपापसांतील सर्व मतभेद विसरून गावच्या विकासावर चर्चा झाली. या वेळी गावचे सामाजिक कार्यकर्ते बाबाजी शिंदे व मॉडर्न इंग्लिश स्कूलचे अध्यक्ष गोपीनाथ शिंदे यांनी या वेळी ग्रामस्थांना गावचा एकोपा व सलोखा टिकवून ठेवण्याचे आवाहन केले. निवडणुका येतात-जातात. परंतु, निवडणूक प्रक्रियेमध्ये गावाचं नाव खराब होऊ नये तसेच कुठल्याही प्रकारचं इथून पुढेही निवडणुकीत गालबोट लागू नये असे आवाहन गावातील तरुणांना केले. गावच्या विकासासाठी सर्वांनी एकजूट दाखवावी, असे आवाहन त्यांनी केले. तसेच, गावातील भावीपिढी सुद्धा अशाच प्रकारे मतदान प्रक्रियेत सहभागी होईल अशी आशा बाबाजी शिंदे यांनी व्यक्त केली. आदर्श गाव म्हणून आता गावची चर्चा तालुक्यात होत आहे.

.

नळावणे (ता.जुन्नर) येथील निवडणुकीनंर दोन्ही पॅनेलचे उमेदवार, ग्रामस्थ व कार्यकर्ते दिसत असून गोपीनाथ शिंदे मार्गदर्शन करताना दिसत आहे.

Web Title: Candidates and activists of both the panels came together for tea

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.