उमेदवारांचे ‘बाप्पा मोरया!’
By admin | Published: October 13, 2014 11:38 PM2014-10-13T23:38:57+5:302014-10-13T23:38:57+5:30
विधानसभा निवडणुकीत मुंबई गाठता यावी म्हणून शहरातील गणोश मंडळांचा पाठिंबा मिळविण्यासाठी राजकीय नेत्यांची लगबग सुरू आहे.
Next
पिंपरी : विधानसभा निवडणुकीत मुंबई गाठता यावी म्हणून शहरातील गणोश मंडळांचा पाठिंबा मिळविण्यासाठी राजकीय नेत्यांची लगबग सुरू आहे. या मंडळांच्या गणोशासाठी चांदीचे दागिने देऊन, त्यांची मते आपल्या पारडय़ात पाडून घेण्याचा प्रय} करीत आहेत. याचबरोबर मंडळाचे कार्यकर्तेही प्रचारासाठी उपलब्ध होत
असल्याने मंडळांना आपल्याकडे खेचण्यासाठी उमेदवारांची चढाओढ सुरू असल्याची चर्चा मतदारांमध्ये रंगली आहे.
गणोश उत्सवाची ही एकच ओळख न राहता अनेक नगरसेवक, आमदार या कार्यकत्र्याच्या बळावर, तसेच स्वत:ही एक कार्यकर्ता म्हणूनच पुढे आहेत. शहरात सुमारे हजार ते दीड हजार नोंदणीकृत गणोश मंडळे आहेत, तर तेवढीच शासन दरबारी नोंद नसलेली मंडळे आहेत. त्यात एका मंडळात सुमारे दोनशे ते तीनशे कार्यकर्ते असतात. तसेच ज्या परिसरात हे मंडळ असेल, त्या परिसरातील नागरिकांचाही या मंडळाशी जवळचा संबंध असतो. त्यामुळे एका मंडळामागे सुमारे 5क्क् ते 1क्क्क् मते जोडून घेणो उमेदवारास शक्य होते.
या मंडळांच्या एकगठ्ठा मतदारांकडे उमेदवारांचा डोळा असून, ही मते आपल्या पारडय़ात पाडून घेण्यासाठी उमेदवारांकडून आश्वासनांचा पाऊस पाडला
जात आहे. (प्रतिनिधी)