उमेदवार दिले, पण ताकद कुठंय? आता पुणेकर 'मन' सेच मतदान करणार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2024 04:38 PM2024-10-28T16:38:29+5:302024-10-28T16:39:04+5:30

पुणे शहरातील विधानसभेच्या लढती पाहता मनसेला जागा निवडून आणण्याचे आव्हानच असणार

Candidates given, but where is the strength? Now Punekar will vote with 'mind' | उमेदवार दिले, पण ताकद कुठंय? आता पुणेकर 'मन' सेच मतदान करणार

उमेदवार दिले, पण ताकद कुठंय? आता पुणेकर 'मन' सेच मतदान करणार

पुणे : शहरातील कोथरूड, कसबा, खडकवासला आणि हडपसर या चार विधानसभा मतदारसंघांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उमेदवार दिले आहेत. पण या मतदारसंघात पक्षाची ताकद कुठे आहे, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

विधानसभा निवडणूक मनसे स्वतंत्रपणे लढणार असल्याचे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जाहीर केले आहे. त्यानुसार पुणे शहरातील आठ मतदारसंघांपेकी कोथरूड,कसबा, हडपसर आणि खडकवासला मतदारसंघात उमेदवारी दिली आहे. कोथरूडमधून किशोर शिंदे, हडपसरमधून साईनाथ बाबर, खडकवासलामधून मयूरेश वांजळे, कसब्यातून गणेश भोकरे यांना उमेदवारी दिली आहे. 

कोथरूड विधानसभा मतदार संघातून किशोर नाना शिंदेनी २०१९ ची निवडणूक लढवली होती. तेव्हा चंद्रकांत पाटलांनी २० ते २५ हजारांच्या फरकाने त्यांचा पराभव केला होता. इतर पक्षांनी तेव्हा शिंदेंना पाठिंबा दिला होता. आताही मनसेला कोथरूमधून निवडून येण्यासाठी ताकद लावावी लागणार आहे. आता या लढतीत चंद्रकांत मोकाटे यांचा आघाडीकडून उतरले आहेत. ही लढत तिरंगी होणार असल्याने मनसेसमोर सध्या २ उमेदवारांचे आव्हान आहे. हडपसर विधानसभेतून एकदाही आमदारकी न लढवलेल्या साईनाथ बाबर यांना मनसेने संधी दिली आहे. इथंही तिरंगी लढत होणार असली तरी शरद पवार गट आणि अजित पवार गट यांच्या मुख्य लढतीने लक्ष वेधले आहे. 

खडकवासला विधानसभा मतदार संघातून दिवंगत आमदार रमेश वांजळे यांचे चिरंजीव मयुरेश वांजळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. रमेश वांजळे २००९ च्या निवडणुकीत प्रचंड मताधिक्याने निवडून आले होते. खडकवासला मतदार संघात वांजळेंचा मोठा चाहता वर्ग आहे. आता मयुरेश वांजळेंच्या माध्यमातून पुन्हा मनसेचा झेंडा फडकेल का? हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे. 

कसबा विधानसभा निवडणूक धंगेकरांच्या विजयाने चर्चेत आली होती. हा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. यंदाही हेमंत रासने विरोधात रवींद्र धंगेकर अशी मुख्य लढत पाहायला मिळणार आहे. अशातच तरुण सामाजिक कार्यकर्ते गणेश भोकरे यांना मनसेकडून निवडणूक लढवण्याची संधी मिळाली आहे. भोकरेंचा तसा पेठांमध्ये दांडगा संपर्क पाहायला मिळत आहे. त्यांची राजकीय वाटचाल आताच सुरु झाली आहे. कसब्यातील नागरिक 'मन' से कोणाला मतदान करणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.      

Web Title: Candidates given, but where is the strength? Now Punekar will vote with 'mind'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.