उमेदवारांचे ‘जागते रहो!’

By admin | Published: October 15, 2014 05:37 AM2014-10-15T05:37:06+5:302014-10-15T05:37:06+5:30

सोमवारी प्रचाराच्या तोफा थंडावल्या. आचारसहितेमुळे मंगळवारी उघड प्रचार होत नसला, तरी छुप्या पद्धतीने प्रचार सुरू होता

Candidates 'Keep Awake!' | उमेदवारांचे ‘जागते रहो!’

उमेदवारांचे ‘जागते रहो!’

Next

पिंपरी : सोमवारी प्रचाराच्या तोफा थंडावल्या. आचारसहितेमुळे मंगळवारी उघड प्रचार होत नसला, तरी छुप्या पद्धतीने प्रचार सुरू होता. शेवटच्या सत्रात आपण कोठे कमी पडू नये, यासाठी डोळ्यात तेल घालून रात्र जागवली गेली. मतदारांना आकर्षित करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्नही उमेदवारांनी अजमावले.
या वेळी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आघाडी आणि महायुती तुटली आहे. त्यामुळे मतविभागणी होण्याची शक्यता आहे. अर्ज भरल्यापासून सर्वच उमेदवारांनी आपली सर्व ताकत पणाला लावून प्रचार केला. मतदानाआधीचा हा दिवस सगळ्यांसाठीच वैऱ्याची रात्र आहे. प्रचारामध्ये कोणत्याही प्रकारची कसूर न करता पूर्णपणे प्रचार केल्यानंतर आता शेवटचा दिवस व शेवटची रात्र ही निर्णायक रात्र आहे. म्हणून सर्वच पक्षांची नेतेमंडळी, उमेदवार, कार्यकर्ते मैदानात उतरलेले दिसले. सकाळपासूनच प्रत्येकजण कामात असल्याचे दिसत होते. गुप्त बैठका आणि मतदारांना अनेक प्रलोभने देण्याचाही प्रयत्न झाल्याची चर्चा आहे.
उमेदवारांनी आपल्या निवडक कार्यकर्ते यांच्यावर विशिष्ट कामाची जबाबदारी सोपविली होती. प्रत्येक वार्डातील प्रत्येक प्रमुख कार्यकर्ते प्रत्येक मतदारापर्यंत जाण्याचा प्रयत्न करत होते. या वेळी आघाडी आणि युती फुटल्यामुळे मतांची फेर जुळवाजुळव करावी लागत आहे. आपला पारंपरिक मतदार आपल्यामागे उभा राहावा यासाठी प्रत्येक उमेदवार प्रचार करताना दिसला. शेवटचा दिवस व शेवटची रात्र ही मतदानासाठी निर्णायक ठरणारी असते.
गुप्त पद्धतीने प्रचारावर भर दिला जात आहे. मतदारांचा अंदाज घेऊन कार्यकर्त्यांमार्फत मतदारांना वळवण्याचा शेवटचा प्रयत्न उमेदवार दिवसभर करीत होते.
निवडणूक विभागाची करडी नजर
सर्वच मतदारसंघात निवडणूक विभागाच्या निरिक्षकांनी फेरफटका मारून पाहणी सुरू होती. पोलिसांचे विशेष लक्ष होते. (प्रतिनिधी)

Web Title: Candidates 'Keep Awake!'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.