उमेदवारांची धाव बुवा-महाराजांकडे
By admin | Published: February 18, 2017 03:00 AM2017-02-18T03:00:13+5:302017-02-18T03:00:13+5:30
हवेली तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या रणधुमाळीस सुरूवात झाली असून, त्यात प्रस्थापित गावपुढाऱ्यांची
लोणी काळभोर : हवेली तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या रणधुमाळीस सुरूवात झाली असून, त्यात प्रस्थापित गावपुढाऱ्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. बहुतांश ठिकाणी निवडणुकीत चुरस निर्माण झाल्याने आपणच निवडून यावे म्हणून उमेदवारांनी चक्क बुवा, मांत्रिक, देवरूषी, महाराज यांच्याकडेही आशीर्वादासाठी धाव घेतली आहे. त्यामुळे बाजारात नारळ, लिंबू - मिरची, गंडे - दोरे, अंगारा - धुपारा यांना भाव आल्याची तालुक्यात चर्चा आहे.
अत्यंत गुप्तपणे अंगारा - धुपारा, लिंबू - मिरची, टाचणी व बिबव्यासह कुलदेवतेचा भंडारा उधळून निवडणूकीतील विजय निश्चितीसाठी देव - देवतांना कौल लावण्याच्या प्रकारांत वाढ झाली आहे. केवळ सत्ता मिळावी या हव्यासापोटी अंधश्रध्देच्या मागे जाण्यात पुढारीही मागे नाहीत असे दिसून येत आहे.
विजयाची निश्चिती करण्यासाठी साम, दाम, दंड, भेद यांचा अवलंब सुरू आहे. सामिष जेवणावळींसह विविध प्रकारे साऱ्यांना खूश ठेवण्याचा प्रयत्न सुरू आहे. हॉटेल, ढाबे, केटरिंगवाले यांना सुगीचे दिवस आले आहेत. उमेदवारांनी मतदारांच्या प्रत्यक्ष गाठीभेटींवर भर दिला असल्याने गांवागावांतील वातावरण ढवळून निघाले आहे. (वार्ताहर)
आळीनिहाय जेवणावळी!
४इतर वेळी ढुंकूनही न पाहणारे राजकीय पुढारी आता मात्र
दोन्ही हात जोडून वेळप्रसंगी साष्टांग दंडवत घालून ‘नमस्कार या वेळी लक्ष असू द्या’ असे म्हणत विनवण्या करून साद घालताना दिसत आहेत.
४मतदार नाराज राहू नये याकरिता आळीनिहाय जेवणावळींचे आयोजन करण्यात येत असून, आग्रहाचे आमंत्रण देऊन मतदारराजाच्या आवडीचे खाद्यपदार्थ पुरवले जात आहेत.