उमेदवारांनी घेतली विश्रंती
By admin | Published: October 17, 2014 12:05 AM2014-10-17T00:05:30+5:302014-10-17T00:05:30+5:30
गेल्या 15हून अधिक दिवस सुरूअसलेला रात्रंदिवस प्रचार, त्यामुळे झालेले जागरण, पायपीट यामुळे आलेला शीण घालविण्यासाठी बहुतांशी उमेदवारांनी आज विश्रंती घेणो पसंत केल़े
Next
पुणो : गेल्या 15हून अधिक दिवस सुरूअसलेला रात्रंदिवस प्रचार, त्यामुळे झालेले जागरण, पायपीट यामुळे आलेला शीण घालविण्यासाठी बहुतांशी उमेदवारांनी आज विश्रंती घेणो पसंत केल़े मात्र, त्याला काही उमेदवार
अपवाद ठरल़े काल मतदान संपल्यानंतर आज सकाळपासून त्यांनी आपल्या नेहमीच्या कामाला सुरुवात केली़
आघाडी आणि युती तुटल्याने अनेकांना उशिरा उमेदवारी मिळाली़ काही जणांना अनपेक्षितपणो पक्षाकडून निवडणूक लढविण्याचे आदेश आल़े त्यामुळे उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर साधनसामग्रीची जुळवाजुळव करून त्यांनी प्रचाराला सुरुवात केली़
सर्वच उमेदवारांनी थेट मतदारांशी संपर्क साधण्यासाठी पदयात्रंवर भर दिला होता़ त्यामुळे पहाटे मतदारसंघातील उद्यानात फेरी, त्यानंतर सकाळ , सायंकाळी काही किलोमीटर पदयात्र, त्याच्या जोडीला दिवसभर भरगच्च कार्यक्रम यामुळे अनेकांची जवळपास 15 दिवस झोप अतिशय कमी झाली होती़ त्याचा ताण शेवटीशेवटी त्यांच्या चेह:यावर जाणवू लागला होता़ पण, मतदानाचा दिवस महत्त्वाचा असल्याने सर्वानीच रात्रीचा दिवस करून काल जास्तीतजास्त मतदान घडवून आणण्याचा प्रयत्न केला़ (प्रतिनिधी)
4बुधवारी मतदान संपल्यानंतर आढावा घेऊन उमेदवारांनी कार्यकत्र्याना निरोप दिला़ अनेकांनी आपले मोबाईल स्विच ऑफ करुन विश्रंती घेणो पसंत केल़े आज दिवसभर अनेकांनी घरच्याबरोबर वेळ घालविला़
4काही उमेदवारांनी नेहमीप्रमाणो आपले काम सुरु केल़े सकाळी नास्ता
घेतल्यावर बाहेर पडल़े कार्यकत्र्याच्या भेटीगाठी, एक्झीट पोलविषयी चर्चा, आलेल्या लोकांची कामे हातावेगळी करणो असा संपूर्ण दिवस कामात घालविला़
दिवसभर कार्यकर्ते भेटायला येत होते. त्यांच्या गप्पा व निवडणुकीच्या अंदाजावर चर्चा झाली. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही सायंकाळी 6 वाजता काँग्रेस भवनला अचानक भेट दिली. त्या वेळी शहरातील निवडणुकीविषयी त्यांच्याशी चर्चा केली.
- अॅड. अभय छाजेड
प्रचाराच्या काळात एकही दिवस विश्रंती मिळाली नाही. त्यामुळे गुरुवारी दिवसभर विश्रंती घेण्याचा प्रयत्न केला. परंतु, सकाळपासूनच कार्यकत्र्याची रीघ सुरू होती. निवडणुकीतील अंदाजाची चर्चा सुरू होती. मतदारसंघातील ज्येष्ठ नागरिकांनीही आवजरून भेटून शुभेच्छा व आशीर्वाद दिले.
- सुभाष जगताप
प्रचारात युवा कार्यकत्र्यानी उत्साहाने खिंड लढविली. त्यामुळे सकाळपासूनच कार्यकर्ते भेटायला आले. पर्वती मतदारसंघातील गणोश मंडळे,
ज्येष्ठ नागरिक संघटना व महिला मंचाने प्रचारात
हिरिरीने भाग घेतला. दिवसभरात प्रत्यक्ष भेटून त्यांचे मनापासून आभार मानले. - सचिन तावरे
निवडणुकीच्या काळात कोणताही ताण न घेता प्रचारात आघाडी घेतली. सकाळी उठून नियमित वेळापत्रकानुसार कामकाज सुरू झाले. मतदारसंघातील पक्षाचे पदाधिकारी व कार्यकत्र्याच्या भेटी घेतल्या. त्यानंतर सायंकाळी चार वाजता महापालिकेत येऊन इतर सहकारी नगरसेवक, पदाधिकारी व पत्रकारांशी गप्पा मारल्या.
- बाबूराव चांदेरे