एमपीएससीची ऑनलाईन अर्जप्रणाली उमेदवारांना अद्ययावत करता येणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 04:16 AM2021-08-20T04:16:12+5:302021-08-20T04:16:12+5:30

एमपीएससीने, उमेदवारांना स्वत: ई-मेल आयडी व मोबाईल क्रमांक अद्ययावत करण्याबाबतची सुविधा पुढील आठवड्यापासून उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे ...

Candidates will be able to update the online application system of MPSC | एमपीएससीची ऑनलाईन अर्जप्रणाली उमेदवारांना अद्ययावत करता येणार

एमपीएससीची ऑनलाईन अर्जप्रणाली उमेदवारांना अद्ययावत करता येणार

Next

एमपीएससीने, उमेदवारांना स्वत: ई-मेल आयडी व मोबाईल क्रमांक अद्ययावत करण्याबाबतची सुविधा पुढील आठवड्यापासून उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे.

विद्यार्थ्यांनी केलेल्या सूचनांनुसार खाते अद्ययावत करत असताना जुन्या खात्यामध्ये नोंदविण्यात आलेला मोबाईल क्रमांक व ई-मेल आयडी चुकीचे नोंदविल्याने किंवा ज्ञात नसल्याने किंवा दोन्ही बंद असल्याने ओटीपी प्राप्त होत नव्हता. पर्यायाने पासवर्ड बदलण्यामध्ये उमेदवारांना अडचण येत असल्याचे निदर्शनास आले आहे. पासवर्ड बदलून खाते अद्ययावत करता येत नसल्यामुळे मोबाईल क्रमांक व ई-मेल आयडी बदलून मिळावा याकरिता उमेदवारांकडून आयोगाच्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करत होते. मात्र, सातत्याने प्रयत्न होत असल्याचे व मोठ्या प्रमाणात प्राप्त होत असलेल्या कॉल्समुळे सदर टोल फ्री क्रमांक सतत व्यस्त येत होते. त्यामुळे एमपीएससीच्या सुविधा केंद्राकडून उमेदवारांना इच्छित सेवा पुरविण्यात अडथळे येत असल्याचे प्रकर्षाने निदर्शनास येते. यावर विद्यार्थ्यांना सुविधा उपलब्ध झाल्यानंतर स्वत: खाते अद्ययावत करता येईल, असे एमपीएससी म्हटले आहे.

४ सप्टेंबर रोजी नियोजित महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित , गट - ब संयुक्त पूर्व परीक्षा २०२० करिता प्रवेशप्रमाणपत्र नवीन संकेतस्थळावरील उमेदवारांच्या खात्याव्यतिरिक्त अन्य सुयोग्य पध्दतीने सर्व उमेदवारांना सुलभपणे उपलब्ध होईल. अशी व्यवस्था करण्यात येणार असल्याचेही एमपीएससीने म्हटले आहे.

Web Title: Candidates will be able to update the online application system of MPSC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.