टाकाऊ पॅन्ट्रीकार बनले कॅन्टीन, कर्मचारी करू शकतील जेवण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 04:10 AM2021-07-11T04:10:21+5:302021-07-11T04:10:21+5:30
पुणे : घोरपडी येथील कोचिंग कॉम्प्लेक्समध्ये जुनी व टाकाऊ झालेल्या पॅन्ट्रीकारचे रूप पालटून ते कर्मचाऱ्यांना जेवण्यासाठी कॅन्टीनमध्ये त्याचे ...
पुणे : घोरपडी येथील कोचिंग कॉम्प्लेक्समध्ये जुनी व टाकाऊ झालेल्या पॅन्ट्रीकारचे रूप पालटून ते कर्मचाऱ्यांना जेवण्यासाठी कॅन्टीनमध्ये त्याचे रुपांतर करण्यात आले. शनिवारी मध्य रेल्वेचे प्रधान मुख्य यांत्रिक अभियंता ए. के. गुप्ता यांच्याहस्ते व विभागीय रेल्वे व्यवस्थापक रेणू शर्मा यांच्या उपस्थित या नव्या कॅन्टीनचे उद्घाटन झाले. कर्मचाऱ्यांना येथे चहा, नाश्ता व जेवण करता येईल.
गुप्ता यांनी कोचिंग कॉम्प्लेक्समधील विविध कामाचे निरीक्षण करून त्याचा आढावा घेतला. तसेच नव्याने तयार होणाऱ्या कोच वाशिंग प्लांट व झेलम एक्स्प्रेसच्या निरीक्षण केले. यावेळी त्यांनी कर्मचाऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या कामाचे कौतुक केले. यावेळी अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक प्रकाश उपाध्याय, वरिष्ठ विभागीय यांत्रिक अभियंता विजयसिंह दडससह अन्य कर्मचारी उपस्थित होते.