कॅन्टोन्मेन्टच्या शाळेत यंदापासून सीबीएसई
By admin | Published: April 26, 2017 03:53 AM2017-04-26T03:53:40+5:302017-04-26T03:53:40+5:30
यंदाच्या जून महिन्यापासून खडकी कॅन्टोन्मेन्ट बोर्डाची कर्नल भगत इंग्रजी माध्यमाची शाळा सीबीएसई बोर्ड अभ्यासक्रमानुसार करण्याचा निर्णय खडकी कॅन्टोन्मेन्ट बोर्डाने घेतला आहे.
खडकी : यंदाच्या जून महिन्यापासून खडकी कॅन्टोन्मेन्ट बोर्डाची कर्नल भगत इंग्रजी माध्यमाची शाळा सीबीएसई बोर्ड अभ्यासक्रमानुसार करण्याचा निर्णय खडकी कॅन्टोन्मेन्ट बोर्डाने घेतला आहे.
बोर्डाचे अध्यक्ष ब्रिगेडियर यांनी आग्रहाची भूमिका घेत नुकत्याच झालेल्या बोर्डाच्या सर्वसाधारण सभेत या प्रस्तावाला मंजुरी दिली. त्यासाठी शिक्षक भरतीच्या कामासाठी बोर्डाने हिरवा कंदील दाखवला आहे. त्यामुळे शाळेची शैक्षणिक मासिक फीचा ताणही पालकांवर पडणार असून सध्याच्या फी पेक्षा चारपट जास्त फी पालकांना भरावी लागणार.खडकी बोर्डातर्फे २ मराठी माध्यम आणि १ उर्दू माध्यम आणि ४ प्राथमिक ३ मराठी आणि १ उर्दू माध्यम चालवण्यात येते. राज्य सरकारमार्फ त तीन शाळांना १०० टक्के अनुदान मिळते. कर्नल भगत शाळा इंग्रजी माध्यम याचा सर्व खर्च बोर्डाला करावा लागतो. शिक्षकांचे वेतन व इतर खर्च अंदाजे १ कोटी रुपये प्रतिवर्षी इतका आहे. सध्या फी ७५ रुपये मासिक एवढी आहे.
सीबीएसई बोर्ड शाळा केल्यानंतर याची फी साधारण ५०० रुपये मासिक पालकांना भरावी लागणार होती. बोर्डाच्या सर्वसाधारण सभेमध्ये अध्यक्षांनी ५०० रुपये फीचा प्रस्ताव मांडला होता. यावर नगरसेवक सुरेश कांबळे यांनी जोरदार आक्षेप घेत विरोध केला. (वार्ताहर)