कॅन्टोन्मेंंटच्या उपाध्यक्ष निवडीत विलंब

By admin | Published: March 26, 2017 02:11 AM2017-03-26T02:11:19+5:302017-03-26T02:11:19+5:30

पुणे कॅन्टोन्मेंंटच्या उपाध्यक्षांनी राजीनामा देऊन ९ दिवस उलटल्या नंतरही नव्या उपाध्यक्षांच्या निवडीबाबत हालचाली

Cantonment Vice Presidential Pick-up | कॅन्टोन्मेंंटच्या उपाध्यक्ष निवडीत विलंब

कॅन्टोन्मेंंटच्या उपाध्यक्ष निवडीत विलंब

Next

पुणे : पुणे कॅन्टोन्मेंंटच्या उपाध्यक्षांनी राजीनामा देऊन ९ दिवस उलटल्या नंतरही नव्या उपाध्यक्षांच्या निवडीबाबत हालचाली नाहीत. २९ मार्च रोजी बोर्डाची सर्वसाधारण सभा असून, ती उपाध्यक्षांविनाच पार पडणार की मावळत्या उपाध्यक्षांनाच प्रभारी म्हणून काम पाहावे लागणार, याविषयी संदिग्धता आहे.
दिलीप गिरमकर यांनी पदाचा राजीनामा दि. १६ मार्च रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी डी. एन. यादव यांच्याकडे दिला. तो स्वीकारला गेला आहे. त्यानंतर दोन-तीन दिवसांमध्ये नव्या उपाध्यक्षाची निवड होणे अपेक्षित होते. अतुल गायकवाड, विवेक यादव आणि प्रियंका श्रीगिरी यांची नावे इच्छुक म्हणून चर्चेत आहेत. बोर्डाच्या सर्वसाधारण सभेच्या रचनेमध्ये उपाध्यक्षपद लोकप्रतिनिधींमधून नियुक्त केले जाते. अध्यक्षपदी लष्कर प्रशासनातील ब्रिगेडियर दर्जाच्या अधिकाऱ्याची पदसिद्ध निवड संरक्षण विभागाकडून केली जाते.
सदस्य निवडीनंतर ११ फेब्रुवारी रोजी त्याबाबतचा अध्यादेश केंद्र सरकारकडून प्रसिद्ध झाला. त्यानंतर ३ मार्च रोजी डॉ. किरण मंत्री यांची उपाध्यक्षपदी निवड झाली. त्यांनी ३ मार्च १६ रोजी राजीनामा देणे अपेक्षित असताना पक्षनेत्यांच्या सूचनेवरून त्यांनी ९ मार्च रोजी राजीनामा दिला. त्यानंतर ६ दिवसांनी १५ मार्च रोजी गिरमकर यांची निवड करण्यात आली.
उपाध्यक्षपदाचा कालावधी सर्व सदस्यांना समसमान न मिळता कमी अधिक मिळाला आहे. (प्रतिनिधी)

उपाध्यक्षपदाबाबतचा निर्णयाधिकार असलेले कॅन्टोन्मेंंंटचे आमदार दिलीप कांबळे विधिमंडळ अधिवेशनात व्यग्र असल्याने उपाध्यक्षपदाच्या निवडीबाबत विलंब होण्याची शक्यता आहे. ११ जानेवारी २०१५ रोजी बोर्डाच्या सदस्यांची निवडणूक झाली. भाजपाचे ५ सदस्य निवडून आल्याने आगामी ५ वर्षे याच पक्षाच्या सदस्याला उपाध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी मिळणार असून, दर वर्षी एका सदस्याला या पदावर संधी देण्याचे पक्षाच्या श्रेष्ठींनी निश्चित केले आहे.

Web Title: Cantonment Vice Presidential Pick-up

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.