कपॅसिटर टाळणार रोहित्र, कृषिपंपाचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2020 04:10 AM2020-12-06T04:10:20+5:302020-12-06T04:10:20+5:30

बारामती परिमंडलात गतवर्षी रोहित्र जळण्याचे सरासरी प्रमाण ७.४७ टक्के आहे. तब्बल ६२६६ रोहित्र गतवर्षी नादुरुस्त झाले होते. तर यंदा ...

Capacitor will prevent damage to Rohitra, agricultural pump | कपॅसिटर टाळणार रोहित्र, कृषिपंपाचे नुकसान

कपॅसिटर टाळणार रोहित्र, कृषिपंपाचे नुकसान

Next

बारामती परिमंडलात गतवर्षी रोहित्र जळण्याचे सरासरी प्रमाण ७.४७ टक्के आहे. तब्बल ६२६६ रोहित्र गतवर्षी नादुरुस्त झाले होते. तर यंदा झालेल्या मुबलक पावसामुळे चालू रब्बी हंगामात हे प्रमाण आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. साधारणपणे एक जळालेले किंवा नादुरुस्त झालेले रोहित्र दुरुस्त करण्यासाठी किमान २४ हजार रुपयांचा खर्च होतो. त्याच्या क्षमतेनुसार ही किंमत आणखी वाढते. शिवाय ते बदलेपर्यंत महावितरणचा महसूल बुडतो. दुसरीकडे शेतकऱ्यांचेही नुकसान होते. पिके करपतात. उत्पादनात घट होते. त्यामुळे रोहित्र नादुरुस्त होणे महावितरण व शेतकरी दोघांनाही परवडणारे नाही. कपॅसिटर वापराचे फायदे शेतकºयांना सांगण्यासाठी स्वत: मुख्य अभियंता सुनील पावडे, अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटील, कार्यकारी अभियंता गणेश लटपटे व कर्मचाऱ्यानी शुक्रवारी (दि. ६) दुपारी भिगवण उपकेंद्रासमोर असलेल्या उजनी धरणाच्या बॅक वॉटरवर चालू असलेल्या कृषीपंपावर याचे प्रात्यक्षिक शेतकऱ्याना दाखवून ते वापरण्याचे आवाहन केले.

यावेळी केलेल्या प्रात्यक्षिकावेळी कपॅसिटर शिवाय लागणारा करंट कपॅसिटरच्या वापरामुळे साधारणपणे २९ टक्क्यांनी कमी लागला. रोहित्र व कृषीपंप वाचवायचे असतील तर कपॅसिटर हाच एकमेव उपाय आहे. कपॅसिटरमुळे वीजभार कमी होतो. मोटारीचे कंपन कमी होते. पाण्याचा विसर्ग वाढतो. रोहित्र व कृषीपंपाची कार्यक्षमता व आयुर्मान सुधारते. वितरण हानी टळून शेतकरी व कंपनी दोघांचाही फायदाच होतो व गैरसोयही टळते.

फोटो

०५१२२०२०बारामती-१३

Web Title: Capacitor will prevent damage to Rohitra, agricultural pump

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.