महापालिकेच्या सीसीसीची क्षमता १ हजार २५०
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:10 AM2021-04-16T04:10:53+5:302021-04-16T04:10:53+5:30
दिल्लीमध्ये वाढत्या रुग्णसंख्येमुळे मंगल कार्यालये तसेच हॉॅटेलमध्ये रुग्णांच्या उपचाराची व्यवस्था करण्यात येत आहे. मुंबईतही हाच प्रयोग होत आहे. मात्र, ...
दिल्लीमध्ये वाढत्या रुग्णसंख्येमुळे मंगल कार्यालये तसेच हॉॅटेलमध्ये रुग्णांच्या उपचाराची व्यवस्था करण्यात येत आहे. मुंबईतही हाच प्रयोग होत आहे. मात्र, पुण्यात याची गरज पडणार नाही. कारण तीन हजारांवर महापालिकेचे बेड उपलब्ध आहेत. त्याचबरोबर स्वयंसेवी संस्थांकडेही क्षमता आहे. या ठिकाणी प्राथमिक वैद्यकीय व्यवस्थाही आहे, असे प्रशासनातर्फे सांगण्यात आले.
कोविड केअर सेंटरमध्ये तीन हजारांवर बेड, सध्या ६३१ च रुग्ण
पुणे महापालिकेकडून शहरात हडपसर येथील बनकर शाळा, रक्षकनगर स्टेडियम, संत ज्ञानेश्वर सभागृह येरवडा व गंगाधाम येथे कोविड केअर सेंटर सुरू आहेत़ या चारही ठिकाणी मिळून १ हजार २५० रुग्ण विलग राहू शकतील एवढी क्षमता आहे. सध्या येथे ६३१ कोरोनाबाधित आहेत़ महापालिकेने आणखी १ हजार ९०० बेड क्षमतेचे म्हणजेच, कृषी महाविद्यालय येथे ७५०, बालेवाडी स्टेडियम येथे ३५०, येरवडा येथील आंबेडकर वसतिगृह येथे ३००, घोले रोड येथील आंबेडकर वसतिगृह येथे २०० तर एसएनडीटी येथे ३५० बेडचे केंद्र तयार ठेवले आहेत़ परंतु, लोक घरी विलग राहण्याची व्यवस्था असल्याचे सांगून सीसीसीकडे पाठ फिरवत आहेत़
-------------------------
कोट :-
महापालिकेची सध्या चार कोविड केअर सेंटर सुरू आहेत. कोरोनाबाधितांनी येथे प्रवेश घेण्यासाठी महापालिकेच्या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा़ तसेच थेट संबंधित सीसीसीमध्ये जाऊन कोरोना पॉझिटिव्ह अहवाल दाखवूनही त्या रुग्णाला तेथे प्रवेश दिला जाईल़
राजेंद्र मुठे, उपायुक्त पुणे महापालिका
---------------------------