मतांची मेमरी चिप ट्रेझरीत

By admin | Published: February 25, 2017 02:30 AM2017-02-25T02:30:14+5:302017-02-25T02:30:14+5:30

महापालिका निवडणुकीतील मतदान यंत्रांची मेमरी चिप महापालिकेच्या ट्रेझरीत बंदिस्त करून ठेवण्यात आली. या मेमरी चिपमध्ये त्या यंत्रातील सर्व मतदान आहे तसेच व त्याच क्रमाने सुरक्षित असते.

Caption memory chip Treasures | मतांची मेमरी चिप ट्रेझरीत

मतांची मेमरी चिप ट्रेझरीत

Next

पुणे : महापालिका निवडणुकीतील मतदान यंत्रांची मेमरी चिप महापालिकेच्या ट्रेझरीत बंदिस्त करून ठेवण्यात आली. या मेमरी चिपमध्ये त्या यंत्रातील सर्व मतदान आहे तसेच व त्याच क्रमाने सुरक्षित असते.
महापालिकेच्या ४१ प्रभागांमधील १६२ जागांसाठी निवडणूक आयोगाने ३ हजार ४३१ मतदान केंद्रांची व्यवस्था केली होती. बहुसंख्य केंद्रांवर २, काही ठिकाणी ३ व मोजक्याच दोन प्रभागांमध्ये तीन यंत्रांचा वापर करण्यात आला. साधारण १० हजारपेक्षा जास्त मतदान यंत्रांचा वापर करण्यात आला. मतदान यंत्रे जास्त असली तरी कंट्रोल युनिट म्हणजे मेमरी चिप मात्र एकच असते. मतदारसंख्या २६ लाख ३४ हजार ८०० इतकी होती. त्यापैकी ५५ टक्के म्हणजे १४ लाख ४९ हजार १४० मतदारांनी आपला मतदानाचा हक्क यंत्राच्या माध्यमातून बजावला. ही सर्व मते त्या त्या मतदान केंद्रात असलेल्या कंट्रोल युनिटमध्ये बंदिस्त झाली.
यंत्रांची मेमरी चिप गुरुवारी रात्रीच महापालिकेकडे सुपूर्त केली.

Web Title: Caption memory chip Treasures

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.