Pune | कार्ला गडावरून खाली येताना कारचा अपघात, आठ जण गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2022 10:46 AM2022-11-24T10:46:26+5:302022-11-24T10:47:05+5:30

चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात घडला...

Car accident while coming down from Karla Fort, eight seriously injured | Pune | कार्ला गडावरून खाली येताना कारचा अपघात, आठ जण गंभीर जखमी

Pune | कार्ला गडावरून खाली येताना कारचा अपघात, आठ जण गंभीर जखमी

googlenewsNext

कार्ला (पुणे) : कार्ला गडावरून दर्शन घेऊन खाली येणाऱ्या क्वॉलिस गाडीचा अपघात झाला. या अपघातात कारमधील आठ जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना बुधवारी सकाळी दहाच्या सुमारास घडली. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात घडला.

कार्ला गडावरून खाली येत असताना क्वॉलिस (क्रमांक एम. एच. ०४, एवाय १२९५) कार पलटी झाली. यामध्ये सचिन पाटे, दत्ताराम पवार, महादेव पाटे, श्वेता सचिन पाटे, करुंग चंद्रकांत धुमाळ, वाई वर्षे, दर्शना पाटे, चंद्रमालू वर्षे, चंद्रकांत पाटे, साहिल सचिन पाटे हे जखमी झाले आहेत.

अपघातानंतर काही जण क्वॉलिसमध्ये अडकून पडले होते. चालकाला रस्त्याचा अंदाज आला नसल्याने हा अपघात झाला असल्याचे प्रत्यक्षदर्शीकडून सांगण्यात येत आहे. हा अपघात झाल्यानंतर स्थानिक रिक्षा संघटनेच्या रिक्षा चालकांनी जखमींना तातडीने मदत कार्य करून जखमींना कामशेत येथील खासगी महावीर हॉस्पिटल येथे तातडीने हलविले.

Web Title: Car accident while coming down from Karla Fort, eight seriously injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.