मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर कार व ट्रकचा अपघात, 1 जण गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2018 08:49 AM2018-03-26T08:49:08+5:302018-03-26T08:49:08+5:30
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर लोणावळा व खंडाळादरम्यान सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास ट्रक व कारचा अपघात झाला. या अपघातात कार चालक गंभीर जखमी झाला आहे.
लोणावळा : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर लोणावळा व खंडाळादरम्यान सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास ट्रक व कारचा अपघात झाला. या अपघातात कार चालक गंभीर जखमी झाला आहे. सचिन काकडे असे या जखमी व्यक्तीचे नाव आहे. लोणावळा व खंडाळादरम्यान 50 किमी अंतरावर सोमवारी (26 जानेवारी) सिमेंट वाहतूक करणार्या ट्रकची डस्टर कारला धडक बसून भीषण अपघात झाला. मुंबईकडे जाणार्या मार्गिकेवरील ही दुर्घटना आहे. अपघातामुळे मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, सचिन काकडे हे त्यांच्या डस्टर कार (एम.एच. 14 एफबी 911) मधून मुंबईच्या दिशेने जात असताना सिमेंटची वाहतूक करणा-या ट्रकची (एमएच 12 एमव्ही 4573)त्यांना धडक बसली. या अपघातात कारचा अक्षरशः चुराडा झाला आहे.
अपघाताची माहिती मिळताच आयआरबी व देवदूत पथक घटनास्थळी तातडीनं दाखल झाले. सामाजिक संस्था व महामार्ग पोलिसांनी काकडेंना सुरक्षित कारमधून बाहेर काढले व उपचारांसाठी निगडीतील लोकमान्य रुग्णालय दाखल केले. तसेच अपघातग्रस्त वाहनं रस्त्यावर हटवून वाहतुकीकरिता रस्ता मोकळा केला.