Pune: कारच्या दरवाज्यावर लाथ मारली; शिवीगाळही केली; औंधमध्ये रिक्षाचालकाचे हिंसक वर्तन
By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2024 03:25 PM2024-10-01T15:25:08+5:302024-10-01T15:27:09+5:30
रिक्षाला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला असता रिक्षाचालकाने शिवीगाळ करत कारचालकासाबोत हिंसक वर्तन केले
पुणे : पुण्यातील औंध भागात रिक्षाचालकाची कारचालकासोबत अरेरावी आणि हिसंक वर्तन केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कारचालक औंध मिलिटरी स्टेशनच्या गेटजवळून जात असताना त्यांनी रिक्षाला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला असता रिक्षाचालकाने अरेरावी केली आहे. याबाबत कारचालक ऋषभ वर्मा यांनी सांगवी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तक्रार करूनही अद्याप कोणतीही कारवाई झालेली नसल्याचे समोर आले आहे.
Pune : कारच्या दरवाज्यावर लाथ मारली; शिवीगाळही केली; औंधमध्ये रिक्षाचालकाचे हिंसक वर्तन#Pune#autorikshaw#Police#aundh#carpic.twitter.com/5hguZzm14y
— Lokmat (@lokmat) October 1, 2024
मिळालेल्या माहितीनुसार, 27 सप्टेंबर रोजी पुण्यातील रक्षक चौकाजवळील औंध मिलिटरी स्टेशनच्या गेटबाहेर ही घटना घडली. या घटनेचा व्हिडिओ समाध्यांमावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. ऋषभ वर्मा पत्नीला घेण्यासाठी पुनावळे येथून खराडी येथे जात होते. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास ते औंध मिलिटरी स्टेशनच्या गेटजवळ पोहोचले आणि त्यांनी रिक्षाला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी रिक्षाचालकाने ऋषभ यांच्या कारवर धावून जाण्याचा प्रयत्न केला. कारच्या दरवाज्यावर जोरात लाथ मारली. तसेच खिडकीच्या काचेवरही हाताने मारले. ऋषभ हे कारच्या आतच बसून राहिल्याने त्यांना कोणत्याही प्रकारची इजा न झाल्याचे व्हिडिओमध्ये दिसून आले आहे. चालकाने ऋषभ यांना शिवीगाळ केली, त्यांनी ही संपूर्ण घटना आपल्या कॅमेऱ्यात रेकॉर्ड केली. याबाबत तक्रार करूनही अद्याप कोणतीही कारवाई झाली नाही.