Video: पहिल्या मजल्यावरून गाडी रिव्हर्स घेताना खाली कोसळली; विमाननगर भागातील धक्कादायक व्हिडिओ
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2025 13:06 IST2025-01-22T13:06:11+5:302025-01-22T13:06:54+5:30
पहिल्या मजल्यावरून गाडी काढत असताना कार पुढं घेण्याऐवजी चुकून मागे घेतली असता ती खाली कोसळली

Video: पहिल्या मजल्यावरून गाडी रिव्हर्स घेताना खाली कोसळली; विमाननगर भागातील धक्कादायक व्हिडिओ
पुणे : पुणे शहरातील विमाननगर भागात शुभम अपार्टमेंटमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. शुभम अपार्टमेंटच्या पहिल्या मजल्यावरून गाडी रिव्हर्स घेताना ती थेट खाली कोसळल्याच्या थरारक घटनेचा सीसीटीव्ही समोर आला आहे
पुण्यातील विमाननगर परिसरातील शुभम अपार्टमेंट मध्ये पहिल्या मजल्यावरील पार्किंगमधीलकार पुढं घेण्याऐवजी चुकून मागे घेतली असता ती खाली पडली. सुदैवाने यामध्ये कोणालाही गंभीर इजा झाली नाही. ही घटना विमाननगर परिसरातील शुभम अपार्टमेंट येथे रविवारी सकाळी 10 वाजता घडली असून घटनेचा सीसीटीव्ही फुटेज आला समोर आहे.
कुठलीही जीवितहानी झाली नाही
पुणे शहरातील विमान नगर भागात असलेल्या शुभम अपार्टमेंटमध्ये ही घटना घडली असून सुदैवाने या अपघातात कुठलीही जीवितहानी झाली नाही. पहिल्या मजल्यावरील पार्किंगमध्येकार गाडी मागे घेत असताना हा अपघात झाला. गाडी खाली पडल्याने वाहन चालकाला जोरदार झटका बसला आणि तो मागच्या सीटवर फेकला गेला असल्याचे व्हिडिओमधून दिसत आहे.