वाई-पाचगणी घाटातून जाताना गाडी कोसळली दरीत; २ तरुण ठार, तर दोघे जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2025 23:01 IST2025-03-13T22:59:30+5:302025-03-13T23:01:41+5:30
पसरणी घाटात फोर्ड एंडेवर गाडी १०० मीटर दरीत कोसळली. या भीषण अपघातात लोणी काळभोर (ता. हवेली) येथील दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला.

वाई-पाचगणी घाटातून जाताना गाडी कोसळली दरीत; २ तरुण ठार, तर दोघे जखमी
लोणी काळभोर : वाई-पाचगणी रस्त्यावरील पसरणी घाटात फोर्ड एंडेवर गाडी १०० मीटर दरीत कोसळली. या भीषण अपघातात लोणी काळभोर (ता. हवेली) येथील दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर या अपघातात फोर्ड एंडेवर मधील त्यांचे दोन सहकारी गंभीररीत्या जखमी झाले आहेत.
अक्षय म्हस्कू काळभोर (वय २६), सौरभ जालिंदर काळभोर (वय २६) अशी अपघातात मृत्यू झालेल्या दोन्ही तरुणांची नावे आहेत. तर वैभव काळभोर, बजरंग पर्वतराव (वय ३५, सर्व रा. रायवाडी, लोणी काळभोर, ता. हवेली) अशी जखमी झालेल्या दोघांची नावे आहेत.
दोन्ही जखमींना वाई (सातारा) येथील बेलर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. हा अपघात गुरुवारी (दि. १३) सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडला आहे.