VIDEO: नियंत्रण सुटल्यानं कार कालव्यात पडली; तीन चिमुकल्यांसह पती-पत्नीची सुखरुप सुटका

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2020 07:09 PM2020-09-13T19:09:54+5:302020-09-13T19:10:16+5:30

राजगुरुनगरमध्ये कारला अपघात; चासकमान धरणाच्या डाव्या कालव्यात कोसळली कार

car fell into canal after driver lost control couple rescued with three children | VIDEO: नियंत्रण सुटल्यानं कार कालव्यात पडली; तीन चिमुकल्यांसह पती-पत्नीची सुखरुप सुटका

VIDEO: नियंत्रण सुटल्यानं कार कालव्यात पडली; तीन चिमुकल्यांसह पती-पत्नीची सुखरुप सुटका

Next

राजगुरुनगर: सातकरस्थळ (पूर्व) (ता. खेड) येथे चारचाकी वाहनचालकांचे नियत्रंण सुटल्यामुळे चासकमान धरणाच्या डाव्या कालव्यात चारचाकी पडली दरम्यान स्थानिक तरुणांच्या वेळीच कारमधील तीन चिमुकल्या मुलांसह पती पत्नी सुखरुप बाहेर काढण्यात यश आले आहे.

या घटनेबाबत सविस्तर माहिती अशी की, होलेवाडी (ता खेड ) गुरुदेव साम्राज्य येथे वास्तव्य असलेले प्राथमिक शिक्षक गणेश मगर आपल्या मारुती बलेनो कारमधून (क्र. एम एच १४ ..५०२७) पत्नी, त्यांचा एक आणि शेजारील दोन मुले अश्या पाचजनांसह काळेवाडी, ता. खेड परिसरात असलेल्या सौरंग्या डोंगरावरील दत्त मंदिरात दर्शनासाठी गेले होते. परत येताना दुपारी एकच्या सुमारास सातकरस्थळ येथील चासकमान डाव्या कालव्याच्या पुलावरून वळण घेताना त्यांच्या गाडीचे स्टेअरिंग लॉक होऊन आहे. त्या वेगात जागेवर वळण घेऊन ती थेट कालव्याच्या प्रवाहात जाऊन पाण्यावर तरंगू लागली. अशाही स्थितीत चालक असलेल्या गणेश मगर यांनी सतर्कतेने खिडकीच्या काचेतून पाण्यात उडी मारली. त्याच खिडकीला धरून गाडी ओढून कडेला नेत मदतीसाठी आरडाओरडा केला.

 

कालव्याजवळ असलेल्या महिलांनी आवाज ऐकून त्यांनी आरडाओरडा करून ग्रामस्थांना हाक दिली तत्काळ तुषार सातकर, स्वप्नील सातकर, अशोक सातकर, संदीप सातकर, विशाल सातकर या युवकांनी पाण्यात उड्या मारल्या. गाडी तरंगत प्रवाहात वाहात चालली होती आणि गाडीतील महिला आणि मुले जिवाच्या आकांताने ओरडत होती. पाण्यात उड्या मारलेल्या युवकांनी गाडीचे दरवाजे बाहेरून उघडले. आतील मुलांना व महिलेला घाईघाईने बाहेर काढले. त्यांना कालव्याच्या काठाला आणले. दरम्यान गाडीत पाणी शिरून गाडी बुडाली होती. वेळेत सर्वांना बाहेर काढल्याने पाच जणांचा जीव वाचला. एक तासानंतर क्रेनच्या साहाय्याने बुडालेली कार काढण्यात आली असे सुनील सातकर यांनी सांगितले. चासकमान धरणाच्या डाव्या कालव्याच्या पाण्यात चारचाकी पडल्यावर ही गाडी तरंगत असतानाच आजूबाजूला असलेल्या युवकांनी जीवाची पर्वा न करता पाण्यात उड्या घेऊन गाडीतील पाच जणांना बाहेर काढल्याने युवकांच्या धाडसाचे परिसरात कौतुक होत आहे.

Web Title: car fell into canal after driver lost control couple rescued with three children

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.