भरधाव मोटारीने तिघांना उडवले, पादचारी महिला ठार : सिंहगड रस्त्यावरील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2017 02:33 AM2017-09-09T02:33:22+5:302017-09-09T02:33:33+5:30

भरधाव चारचाकीने वाहनांना धडक देत तीन जणांना उडवले. सकाळी साडेपाचच्या सुमारास ब्रह्मा गार्डनजवळ ही घटना घडली. यामध्ये दोन महिला आणि एक पुरुष असे तीन जण गंभीर जखमी झाले.

Car fired by three cars, pedestrians killed; Sinhagad road incident | भरधाव मोटारीने तिघांना उडवले, पादचारी महिला ठार : सिंहगड रस्त्यावरील घटना

भरधाव मोटारीने तिघांना उडवले, पादचारी महिला ठार : सिंहगड रस्त्यावरील घटना

Next

पुणे : भरधाव चारचाकीने वाहनांना धडक देत तीन जणांना उडवले. सकाळी साडेपाचच्या सुमारास ब्रह्मा गार्डनजवळ ही घटना घडली. यामध्ये दोन महिला आणि एक पुरुष असे तीन जण गंभीर जखमी झाले. उपचारांदरम्यान एका महिलेचा मृत्यू झाला.
अपघातात माधुरी देशपांडे यांचा मृत्यू झाला. सुहासिनी कुलकर्णी (वय ५३) व अतुल चांदगुडे हे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी चालक अशोक विनोदकुमार डे
(रा. ठाणे) याच्यावर सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशोक याने भरधाव कार चालवून तीन लोकांना धडक दिली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अशोक विनोदकुमार डे हा चारचाकीमधून सिंहगड रोडवरून अतिशय वेगाने जात असताना त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटले. या वेळी रस्त्यावरून जात असलेल्या तिघांना त्याने धडक दिली. यामध्ये तिघेही गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारांदरम्यान देशपांडे यांचा मृत्यू झाला. पुढील तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र कोंढरे, संदीप पाडोळे करीत आहेत.

Web Title: Car fired by three cars, pedestrians killed; Sinhagad road incident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.