गाडीला हवा ‘हाच’ नंबर....लाख मोजण्याची तयारी ठेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2020 04:28 AM2020-12-12T04:28:29+5:302020-12-12T04:28:29+5:30

पुणे : आकर्षक नोंदणी क्रमांकासाठी लाखो रुपये खर्च करणाऱ्या वाहनप्रेमींना हे क्रमांक आता महागात पडणार आहेत. परिवहन विभागाने या ...

The car needs the same number .... be prepared to count the lakhs | गाडीला हवा ‘हाच’ नंबर....लाख मोजण्याची तयारी ठेवा

गाडीला हवा ‘हाच’ नंबर....लाख मोजण्याची तयारी ठेवा

Next

पुणे : आकर्षक नोंदणी क्रमांकासाठी लाखो रुपये खर्च करणाऱ्या वाहनप्रेमींना हे क्रमांक आता महागात पडणार आहेत. परिवहन विभागाने या शुल्कात दीड पट ते दुपटीने वाढ सुचविली आहे. सध्या ‘०००१’ या दुचाकीसाठीच्या क्रमांकाला किमान ५० हजार मोजावे लागतात. प्रस्तावित शुल्कानुसार त्यासाठी १ लाख रुपये मोजावे लागु शकतात. सध्या या शुल्कवाढीवर हरकती व सुचना मागविण्यात आल्या असून नवीन वर्षात नवीन शुल्क लागु होण्याची शक्यता आहे.

नवीन दुचाकी किंवा चारचाकी घेतली की अनेक जण आकर्षक किंवा हवा असलेला नोंदणी क्रमांक मिळविण्यासाठी प्रयत्न करतात. परिवहन विभागाने काही आकर्षक क्रमांकांसाठी पुर्वीपासून शुल्क निश्चित केले आहे. सध्या हे शुल्क दुचाकीसाठी ५ हजार ५० हजारांपर्यंत तर चारचाकींसाठी १५ हजार ते ४ लाख रुपयांपर्यंत आहे. पण अनेक जण पसंतीचा क्रमांक मिळविण्यासाठी हे शुल्क भरतात. यातून परिवहन विभागाला मोठा महसुलही मिळतो. महाराष्ट्र मोटार वाहन नियम १९८९ मध्ये सुधारणा करून हे शुल्क वाढविण्यात आले आहे. या प्रारुपानुसार दुचाकीसाठीचे विविध क्रमांकाचे शुल्क दीड ते दुप्पट करण्यात आले आहे. तर चारचाकीच्या काही क्रमांकासाठीही दीड पटीने शुल्क वाढ प्रस्तावित आहे.

सर्वाधिक आकर्षण असलेल्या ०००१ या क्रमांकासाठी चारचाकीला ५ लाख तर दुचाकीला १ लाख शुल्क प्रस्तावित करण्यात आले आहे. सध्या हे शुल्क अनुक्रमे ४ लाख व ५० हजार एवढे आहे. याचप्रकारे इतर क्रमांकासाठी शुल्का वाढ प्रस्तावित आहे. यावर हरकती व सुचना मागविण्यात आल्या असून त्यानंतर सुधारित शुल्कावर शिक्कामोर्तब होणार आहे.

----------------

वाहन नोंदणी क्रमांकासाठीच्या शुल्कातील फरक (कंसात सध्याचे शुल्क)

काही नोंदणी क्रमांक चारचाकी दुचाकी

०००१ ५ लाख (४ लाख) १ लाख (५० हजार)

०००९, ००९९, ०९९९ ९९९९, ०७८६ २.५० लाख (१.५० लाख) ५० हजार (२० हजार)

०१११ ते ०८८८, ११११ ते ८८८८ १ लाख (७० हजार) २५ हजार (१५ हजार)

०००२ ते ००११ ते ००७७,०१००,

०५००,१०००,५०००,९००० आदी ७० हजार (५० हजार) १५ हजार (१० हजार)

००८८,०१०१ ते १०१०,०२०० ते

०९००, १२१२,२८२८,४९४९ आदी २५ हजार (१५ हजार) ७ हजार (५ हजार)

------------------------------------------------

Web Title: The car needs the same number .... be prepared to count the lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.