Pune: वरंधा घाटात कार ९० फूट खोल दरीत कोसळली, उंबर्डे गावाच्या हद्दीतील अपघात

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2023 03:26 PM2023-10-19T15:26:10+5:302023-10-19T15:29:42+5:30

९० फूट खोल दरीत कार गेल्याची घटना गुरुवारी सकाळी घडली...

Car plunges into 90 feet deep ravine at Varandha Ghat, accident in Umberde village limits | Pune: वरंधा घाटात कार ९० फूट खोल दरीत कोसळली, उंबर्डे गावाच्या हद्दीतील अपघात

Pune: वरंधा घाटात कार ९० फूट खोल दरीत कोसळली, उंबर्डे गावाच्या हद्दीतील अपघात

भोर (पुणे) : भोर मार्गे महाडला जाणाऱ्या मार्गावर असलेल्या वरंधा घाटात उंबर्डे गावाच्या हद्दीत ९० फूट खोल दरीत कार गेल्याची घटना गुरुवारी सकाळी घडली. सुदैवाने कारमध्ये कोणीही नसल्याने मोठा अनर्थ टळला.

मिळालेल्या माहितीनुसार, भोर मार्गे महाडच्या दिशेने जात असताना वरंधा घाटातील उंबर्डे (ता. भोर) गावच्या हद्दीत गाडीतून धूर निघत असल्याचे चालकाच्या लक्षात आले असता चालकाने चालकाने गाडी रस्त्याच्या बाजूला उभी करून गाडीतील चालकासह तिघे प्रवासी गाडीतून खाली उतरले. परंतु अचानक गाडी उताराने पुढे जाऊन दरीत कोसळली.

सुदैवाने गाडीत कुणी नसल्याने अनर्थ टळला. मात्र यात गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याचे प्रथमदर्शी अक्षय धुमाळ यांनी सांगितले. याबाबत भोर पोलिस ठाण्यात अद्यापपर्यंत अपघाताबाबत कोणतेही नोंद करण्यात आली नसल्याचे भोर पोलिस स्टेशनकडून सांगण्यात आले.

Web Title: Car plunges into 90 feet deep ravine at Varandha Ghat, accident in Umberde village limits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.