लसीकरणानंतर त्रास झाल्यास ‘केअर सेंटर’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 04:11 AM2021-03-07T04:11:18+5:302021-03-07T04:11:18+5:30
पुणे : शहरात पालिकेच्या तसेच खासगी रुग्णालयांमध्ये कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू आहे. परंतु, अनेकांकडून लसीकरणानंतर किरकोळ स्वरूपाचा त्रास होत ...
पुणे : शहरात पालिकेच्या तसेच खासगी रुग्णालयांमध्ये कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू आहे. परंतु, अनेकांकडून लसीकरणानंतर किरकोळ स्वरूपाचा त्रास होत असल्याच्या तक्रारी केल्या जात आहेत. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून पालिकेकडून ‘पोस्ट व्हॅक्सिन केअर सेंटर’ सुरू करण्यात येणार आहे.
महापालिकेने शासनाच्या निर्देशांनुसार, ६० वर्षांपुढील ज्येष्ठ नागरिक आणि ४५ वर्षांपुढील व्याधीग्रस्त नागरिकांना लस देण्यात येत आहे. लसीकरणासाठी मोठ्या प्रमाणावर नागरिक नोंदणीही करीत आहेत. प्रशासनाकडून केंद्र वाढविण्यावर भर देण्यात येत आहे. लसीकरणानंतर ताप येणे, डोकेदुखी, अंगदुखी असा त्रास होत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून केल्या जात आहेत.
त्यामुळे लसीकरणानंतर नागरिकांनी प्रकृतीविषयक त्रास होऊ नये याकरिता हे केअर सेंटर सुरू करण्यात येणार आहेत. पालिकेच्या लसीकरण सुरू असलेल्या दवाखान्यांमध्ये ही सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती अतिरीक्त आयुक्त रुबल अगरवाल यांनी दिली.