पुण्यात केअर टेकर तरुणीवर बलात्कार, बांधकाम व्यावसायिकाच्या आवळल्या मुसक्या
By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2024 05:28 PM2024-05-14T17:28:50+5:302024-05-14T17:29:13+5:30
याबाबत एका तरुणीने गुलटेकडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे...
पुणे : आईच्या सेवा शुश्रूषेसाठी कामावर ठेवलेल्या तरुणीवर बलात्कार केल्याप्रकरणी मार्केट यार्ड भागातील एका बांधकाम व्यावसायिकास अटक करण्यात आली. प्रवीण बंब (वय ४५, रा. लालबाग सोसायटी, गुलटेकडी) असे अटक आराेपीचे नाव आहे. याबाबत एका तरुणीने गुलटेकडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
बंब याची आई आजारी आहे. तिच्या शुश्रूषेसाठी त्याने तरुणीला कामावर ठेवले होते. ओळखीचा गैरफायदा घेऊन आराेपीने तिच्यावर घरात अत्याचार केले, तसेच खडकवासला येथील एका लाॅजवर नेऊन तिला धमकावले. बळजबरीने बीअर पाजून बलात्कार केला. घडलेल्या प्रकाराची माहिती कोणाला दिल्यास जिवे मारण्याची धमकी दिली.
घाबरलेल्या तरुणीने पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर बंबला अटक करण्यात आली असून, न्यायालयाने त्याला पोलिस कोठडी सुनावली आहे. बंब हा बांधकाम व्यावसायिक असून, तो शेअर दलाल म्हणून काम करतो. सहायक पोलिस निरीक्षक राहुल कोलंबीकर तपास करीत आहेत.