विद्यार्थ्यांसाठी करिअर गायडन्स

By admin | Published: May 28, 2015 11:24 PM2015-05-28T23:24:03+5:302015-05-28T23:24:03+5:30

लोकमत अ‍ॅस्पायर एज्युकेशन फेअरचे तसेच भव्य शैक्षणिक प्रदर्शनाचे आयोजन ३० मे ते १जून दरम्यान गणेश कला क्रीडा मंच, स्वारगेट येथे करण्यात आले आहे.

Career Guidance for Students | विद्यार्थ्यांसाठी करिअर गायडन्स

विद्यार्थ्यांसाठी करिअर गायडन्स

Next

पुणे : शैक्षणिक तसेच सामाजिक क्षेत्रात नेहमीच पुढाकार घेणाऱ्या ‘लोकमत समूह व द युनिक अ‍ॅकेडमी’ यांच्या सहयोगाने लोकमत अ‍ॅस्पायर एज्युकेशन फेअरचे तसेच भव्य शैक्षणिक प्रदर्शनाचे आयोजन ३० मे ते १जून दरम्यान गणेश कला क्रीडा मंच, स्वारगेट येथे करण्यात आले आहे.
यामधे करिअर गायडन्स, ग्रीन टेक्नॉलॉजी, बदलत्या भारतातील विकासाच्या संधी, एमपीएससी-युपीएससी अशा विविध विषयांवरील मार्गदर्शनाचा विद्यार्थ्यांसह पालकांना लाभ घेता येणार आहे. आज सकाळी 11 वाजता या एज्युकेशन फेअरचे उद्घाटन होणार आहे.
याशिवाय महाविद्यालये, शाळा, मेडिकल, इंजिनिअरिंग, आर्किटेक्टचरपासून फॅशन, ग्राफि क्स, इंटिरियर डिझाईनपर्यंत व रिटेल, आयटीआय, एव्हिएशनपासून मीडिया, अ‍ॅनिमेशन, गेमिंगपर्यंत तसेच विविध विद्यापीठे, प्रोफेशनल क्लासेस, आयटीआय, हॉटेल मॅनेजमेंट, फॉरेन लँग्वेजेस, पॉलिटेक्निकल, स्पोकन इंग्लिश, लॉ कॉलेज, हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट, कॅपिटल मार्केट या सर्व इन्स्टिट्यूट प्रदर्शनात सहभागी होणार आहेत. एकाच ठिकाणी शैक्षणिक माहितीचा खजिना उपलब्ध होणार असल्याने ग्राहकांचा वेळ व पैसा वाचणार आहे. या उपक्रमाचे प्रयोजक द युनिक अ‍ॅकॅडमी व न्यू इन्डिया एश्योरन्स आहेत. (प्रतिनिधी)

दिनांकवेळवक्ताविषय
३० मे सायं. ५.००तुकाराम जाधवएमपीएससी व
युपीएससीची तयारी
सायं. ६.००कल्पेश गवळीग्रीन टेक्नॉलॉजी
सायं. ७.००संतोष तलगट्टीवारइन्स्पीरेशन अ‍ॅण्ड इनोव्हेशन इन एज्युकेशन
३१ मेस. १०.३०राजन वाळवेपुढील १० वर्षांतील सायन्समधील संधी
स. ११.१५संतोष कार्लेविविध कॉलेजमधील एडमिशन प्रोसिजर
सायं. ५.००वंदना मल्होत्राहॉटेल मॅनेजमेन्ट
स्वप्नाली भोसलेमॅनेजमेन्ट
अजित शिंदेइटेरियर, फॅशन, इव्हेंट, डिझाईन
सायं. ६.००डॉ. मकरंद ठोंबरेनो युवर इक्यू अ‍ॅण्ड आयक्यू सविता मराठेअ‍ॅपटीट्यूट अ‍ॅण्ड करियर प्लॅनिंग
सायं. ७.००डॉ. सुनिल देशपांडेबदलत्या भारतातील डॉ. श्रीराम नेर्लेकरविकासाच्या संधी
१ जूनसायं. ४.३०डॉ. जी. के. शिरुडेस्कील डेव्हलमेन्ट
सायं. ५.१५श्याम यादव, करिअयर इन सॅप कोर्सेस डॉ. हॅरॉल्ड डिकोस्टाअ‍ॅण्ड सायबर सिक्यूरीटी

Web Title: Career Guidance for Students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.