वैद्यकीय क्षेत्रातील करिअर:_
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 04:12 AM2021-08-19T04:12:48+5:302021-08-19T04:12:48+5:30
चिकाटी, सातत्य, संयम, सेवाभावी वृत्ती, समर्पण भावना, मेहनत करण्याची तयारी हवी. बुद्धिमत्तेबरोबरच तार्किक क्षमता, भाषिक क्षमता विश्लेषण करण्याची ...
चिकाटी, सातत्य, संयम, सेवाभावी वृत्ती, समर्पण भावना, मेहनत करण्याची तयारी हवी. बुद्धिमत्तेबरोबरच तार्किक क्षमता, भाषिक क्षमता विश्लेषण करण्याची क्षमता, तसेच भावनिक व सामाजिक समायोजन हवे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे वैद्यकीय क्षेत्राची उच्च प्रतीची अभिरुची म्हणजेच आवड हवी.
★ विषयनिवड : इयत्ता अकरावीमध्ये विज्ञान शाखेला प्रवेश घेणे महत्वाचे आहे. अकरावीमध्येच मेडिकल क्षेत्राला आवश्यक विषयांची निवड करणे आवश्यक आहे. फिजिक्स, केमिस्ट्री, बॉयोलॉजी हा ग्रुप निवडणे आवश्यक आहे, फार्मसीला जायचे असेल तर भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र व गणित हे विषय आवश्यक आहेत.
अभ्यासक्रम :
अखिल भारतीय स्तरावरील शासकीय अनुदानित-विनाअनुदानित खासगी महाविद्यालय, तसेच अभिमत व स्वायत्त विद्यापीठामध्ये पुढील अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. तसेच, आयुष मंत्रालयाव्दारेसुद्धा काही अभ्यासक्रम चालविले जातात.
अभ्यासक्रम व कालावधी -
1 M.B.B.S. बॅचलर ऑफ मेडिसिन अँड बॅचलर ऑफ सर्जरी, साडेचार वर्षे, एक वर्ष इंटर्नशिप
2 B. D. S. बॅचलर ऑफ डेंटल सर्जरी, चार वर्षे, एक वर्ष इंटर्नशिप
3 B.A.M.S बॅचलर ऑफ आयुर्वेदिक मेडिसिन अँड सर्जरी, साडेचार वर्षे, एक वर्ष इंटर्नशिप
4. B.H. M. S. बॅचलर ऑफ होमिओपॅथिक मेडिसिन अँड सर्जरी, साडेचार वर्षे, एक वर्ष इंटर्नशिप
5 . B. U.M.S. बॅचलर ऑफ युनानी मेडिसिन अँड सर्जरी, चार वर्षे, एक वर्ष इंटर्नशिप
6. B.S.M.S. बॅचलर ऑफ सिद्धा मेडिसीन अँड सर्जरी, चार वर्षे, एक वर्ष इंटर्नशिप
7. B.N.Y.S. बॅचलर ऑफ नॅचरोपॅथी अँड योगिक सायन्स, चार वर्षे, एक वर्ष इंटर्नशिप
प्रवेश परीक्षा व प्रवेश प्रक्रिया -
वैद्यकीय क्षेत्रातील अभ्यासक्रमांसाठी सध्या अखिल भारतीय स्तरावर NEET म्हणजेच National Eligibility Entrance Test ही एकच परीक्षा राबविली जात आहे. National Testing Agency द्वारे ही परीक्षा घेतली जात आहे. इयत्ता बारावीमध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, बॉयोलॉजी, तसेच इंग्रजी हे विषय आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी प्रवेश परीक्षा पद्धत, प्रवेश प्रक्रिया याबाबत होणारे बदल वेळोवेळी पाहणे आवश्यक.
उपलब्ध जागा:_
एकूण जागा / महाविद्यालये:_ 1: अखिल भारतीय स्तरावर M. B. B. S. साठी 83920 प्रवेशक्षमता असून, 542 वैद्यकीय महाविद्यालय आहेत. तसेच, महाराष्ट्रामध्ये 9000 प्रवेशक्षमता असून, 57 वैद्यकीय महाविद्यालय आहेत. 2: अखिल भारतीय स्तरावर B.D.S.साठी 26 949 प्रवेशक्षमता असून, 313 वैद्यकीय महाविद्यालय आहेत. तसेच, महाराष्ट्रामध्ये 3444 प्रवेशक्षमता असून, 37 वैद्यकीय महाविद्यालय आहेत.
अधिक माहितीसाठीWWW.dmer.org. ही वेबसाईट पाहावी
संगीता निंबाळकर,
करिअर समुपदेशक