अर्थशास्त्रातील करिअरच्या संधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 04:10 AM2021-03-18T04:10:35+5:302021-03-18T04:10:35+5:30
---------------------------- अर्थशास्त्रात काय आहेत संधी ? - अर्थशास्त्रात पदवी, पदव्युत्तर पदवी, नेट - सेट पीएच.डी. करून चांगल्या महाविद्यालयात, विद्यापीठामध्ये ...
----------------------------
अर्थशास्त्रात काय आहेत संधी ?
- अर्थशास्त्रात पदवी, पदव्युत्तर पदवी, नेट - सेट पीएच.डी. करून चांगल्या महाविद्यालयात, विद्यापीठामध्ये अर्थशास्त्राचा अध्यापक - संशोधक म्हणून नोकरी मिळू शकते. - शासनाच्या ध्येयधोरणाच्या निश्चितीमध्ये आपला सहभाग असावा, असे वाटणाऱ्या करिअरिस्टिक विद्यार्थ्यांना इंडियन इकॉनॉमिक सर्व्हिसेस (आयएफएस) या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत नशीब अजमावता येते. - अर्थशास्त्र, सांख्यिकी अर्थशास्त्र, इकॉनोमॅट्रिक्स, संशोधनाची आवड असणाऱ्यांसाठी भारतीय रिझर्व बँकेत विद्यार्थीदशेपासूनच संधी आहेत. - पदव्युत्तर पदवी करत असताना आरबीआयची ''यंगस्कॉलर''ची स्पर्धा परीक्षा देऊन थेट रिझर्व बँकेच्या सेवेत पहिल्या टप्प्यावर दाखल होण्याची संधी आहे. - आरबीआयच्या द्वितीय श्रेणीतील नोकरीच्याही संधी खास अर्थशास्त्राच्या विद्यार्थ्यांसाठी असतात. - आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, पुनर्निर्माण आणि विकासासाठीची आंतरराष्ट्रीय बँक (जागतिक बँक) यांच्याही सेवा क्षेत्रात जाण्याच्या संधी आहे. - सेबी, इंडियन बँक असोसिएशन, नॅशनल हाऊसिंग बोर्ड, आयात-निर्यात बँक, ग्रामीण विकास बँक, लघुउद्योग विकास बँक, सहकारी बँका यांसारख्या ठिकाणी नोकरीच्या उत्तम संधी मिळू शकतात. - शासनपातळीवर कररचना व कर आकारणी करण्यासाठी अर्थशास्त्रीय ज्ञानाची नितांत गरज आहे. - शेतीशी संबंधित प्रश्नांचे उत्तरे शोधण्यासाठी कृषी अर्थशास्त्र अभ्यासकांची गरज सातत्याने भासत आहे. - अर्थशास्त्रासोबत विधी, व्यवस्थापन, पर्यावरण, उत्पादन, वित्तीय संबंध यातील पदवी, पदव्युत्तर पदवी, पदविका पूर्ण केली तर आणखी चांगल्या संधी उपलब्ध होतात.
------------------------------
अर्थशास्त्राचे शिक्षण देणाऱ्या शैक्षणिक संस्था १) टाटा समाज विज्ञान संस्था, चेंबूर, मुंबई, २) गोखले अर्थशास्त्र संस्था, डेक्कन,पुणे, ३) मुंबई स्कूल आॅफ इकॉनॉमिक्स, मुंबई विद्यापीठ, ४) जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, नवी दिल्ली, ५) दिल्ली स्कूल आॅफ इकॉनॉमिक्स, दिल्ली विद्यापीठ, नवी दिल्ली, ६) मद्रास स्कूल आॅफ इकॉनॉमिक्स, मद्रास, ७) सिंबायोसिस विद्यापीठ, पुणे, ८) इंदिरा गांधी इन्स्टिट्यूट आॅफ डेव्हलपमेंट रिसर्च, मुंबई, ९) इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट, १०) बनारस हिंदू विद्यापीठ, ११) शांतिनिकेतन,कोलकाता, १२)कृषि संशोधन व विकास संस्था, बेंगळूरु
------------------------ डॉ. अजय दरेकर, करिअर मार्गदर्शन, बारामती (लेखक काकडे महाविद्यालयात अर्थशास्त्र विषयाचे प्राध्यापक आहेत)