मानसशास्त्रातील करिअर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 04:09 AM2021-04-22T04:09:53+5:302021-04-22T04:09:53+5:30

चिकित्सा मानसशास्त्रात विविध मनोविकारांची लक्षणे, उपचार, निदानपद्धती व उपचार पद्धतीचा अभ्यास केला जातो. तर शैक्षणिक मानसशास्त्रात शैक्षणिक ...

Career in Psychology | मानसशास्त्रातील करिअर

मानसशास्त्रातील करिअर

Next

चिकित्सा मानसशास्त्रात विविध मनोविकारांची लक्षणे, उपचार, निदानपद्धती व उपचार पद्धतीचा अभ्यास केला जातो. तर शैक्षणिक मानसशास्त्रात शैक्षणिक आकृतिबंध, शैक्षणिक समायोजन-मूल्यांकन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक समायोजन इत्यादींच्या अभ्यासावर भर दिला जातो. औद्योगिक व संघटनात्मक मानसशास्त्रात कामाच्या ठिकाणचे वर्तन, उत्पादन क्षमता वाढविण्याची तंत्रे, विशिष्ट नोकरीसाठी योग्य कर्मचारी निवड, कर्मचारी प्रशिक्षण व मूल्यांकन या संदर्भातील मनोवैज्ञानिक अभ्यास केला जातो.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात चिकित्सा, शैक्षणिक व औद्योगिक व संघटनात्मक मानसशास्त्र या तीन विषयांमध्ये एम. ए. करण्याची सोय उपलब्ध आहे. एसएनडीटी व मुंबई विद्यापीठात या तीन विषयांबरोबरच समुपदेशन मानसशास्त्र या विषयाचीही सोय आहे. समुपदेशन हे क्षेत्र मानवी जीवनाचे महत्त्वाचे अंग झालेले आहे. वैवाहिक, कौटुंबिक, व्यवसाय निवड, दैनंदिन आयुष्यात येणाऱ्या विविध समस्यांना सामोरे जाण्याची विशिष्ट काैशल्ये आदी संदर्भातील शास्त्रीय अभ्यास या शाखेत केला जातो.

मानसशास्त्रातील एम. ए. (चिकित्सा मानसशास्त्र) ही पदव्युत्तर पदवी घेतल्यानंतर उपचारक म्हणून काम करावयाचे असल्यास (Cognitive Behaviour Therapy ) बोधनिक उपचार पद्धतीचे प्रशिक्षण कार्यक्रम उपलब्ध आहे. याबरोबरच भावनिक उपचार पद्धतीचे प्रशिक्षण घेणे शक्य आहे. या उपचार पद्धतीची प्रशिक्षण केंद्रे ठाणे, पुणे येथेही आहेत.

विमानचलन मानसशास्त्र (Aviation Psychology) ही अगदी उदयोन्मुख महत्त्वाची मानसशास्त्राची शाखा आहे. विमानसेवा सुरक्षेसंदर्भात संशोधन पायलट, हवाई रहदारी नियंत्रक, विमानचालक दल यांच्या सुरक्षित वर्तनासंदर्भात व सुरक्षिततेच्या संदर्भातील मूल्यांकन, फ्लाइट डेक डिझाइन वैमानिकाची निवड व प्रशिक्षण आदींचा समावेश या अभ्यासक्रमात आहे. यासंदर्भातील कोर्सेस इन्स्टिट्यूट ऑफ एविएशन सायकॉलॉजी- हेग आणि ॲमस्टरडॅम येथे उपलब्ध आहेत.

गुन्हेगारी वर्तनाचा तपास व कायद्याच्या क्षेत्रातील मनोवैज्ञानिक घटक यांचा अभ्यास गुन्हेगारी मानसशास्त्रात केला जातो. ॲडव्हान्स फॉरसॅनिक सायकॉलॉजी (Advanced forsenic Psychology) चा अभ्यासक्रम ख्राइस्ट विद्यापीठ, बेंगलोर येथे उपलब्ध आहे.

आरोग्य मानसशास्त्राची महत्त्वाची दोन उद्दिष्टे आहेत. एक म्हणजे विविध आजार टाळण्यासाठी प्रतिबंधासाठी व्यक्तींना मदत करणे आणि दुसरे म्हणजे निरोगी वर्तनास प्रोत्साहन देणे. व्यक्तींच्या आरोग्यावर मानसिक, जैविक, सामाजिक घटकांचा परिणाम कसा होतो हे अभ्यासणे आरोग्य मानसशास्त्राचा मुख्य हेतू आहे. मानसशास्त्रातील हे सध्याचे खूप महत्त्वाचे क्षेत्र आहे. ख्राइस्ट विद्यापीठ, बेंगलोर आणि हैदराबाद विद्यापीठांमध्ये हा अभ्यासक्रम उपलब्ध आहे.

ग्राहक मानसशास्त्र (कस्टमर सायकोलॉजी) औद्योगिक क्षेत्रातील उत्पादित वस्तू ग्राहकांपर्यंत वितरित करणे महत्त्वाचे ठरते. ग्राहक मानसशास्त्र लोकवस्तू व सेवा का खरेदी करतात, याबरोबरच काैटुंबिक, सांस्कृतिक घटक समाजमाध्यमांमधील संदेश यांचा खरेदी वर्तनावर होणारा परिणाम अभ्यासतात. जाहिरातीतील आकर्षकपणा, उत्पादनाची वेष्टने, सवलत योजना हे ग्राहक मानशास्त्राचे अभ्यासविषय आहेत. ग्राहक मानसशास्त्राचे अभ्यासक्रम ‘स्वयंम्’ या पोर्टलवर ऑनलाइन उपलब्ध आहेत.

मानसशास्त्रातील उच्च शिक्षणानंतर विविध हाॅस्पिटल्स, व्यसनमुक्ती केंद्र, कुटुंब न्यायालय, सरकारी संस्था, सेवाभावी संस्था, औद्योगिक क्षेत्र व शैक्षणिक क्षेत्रांमध्ये नोकरीच्या विविध संधी उपलब्ध आहेत. नवीन मानसिक आरोग्य कायद्यानुसार शासन नोंदणी करून मानसशास्त्रज्ञ म्हणून खासगी प्रॅक्टिस करता येते.

- डाॅ. सुषमा भोसले, प्राचार्या, वाघेरे काॅलेज, सासवड, पुणे

_____________

क्रीडा मानसशास्त्राचे वाढते महत्त्व

क्रीडा मानसशास्त्र ही मानसशास्त्रातील अजून एक महत्त्वाची शाखा खेळाच्या भावानिक व मानसिक, घटकांचा अभ्यास शारीरिक तंदुरुस्तीबरोबर केला जातो. खेळाडूंच्या विशिष्ट क्षमता ओळखून त्यानुसार प्रशिक्षण देणे, खेळाच्या दरम्यान व नंतर उद्भवणाऱ्या तणावाचे व्यवस्थापन करण्याचे प्रशिक्षण देणे, अपयशाचा स्वीकार करणेस शिकविणे आदींचा समावेश या अभ्यासक्रमात होतो.

Web Title: Career in Psychology

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.