सावधान..!  रस्ते '' रंगवणाऱ्यां '' कडून चार महिन्यात ३२ लाखांचा दंड वसूल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2019 12:15 PM2019-04-16T12:15:44+5:302019-04-16T12:25:08+5:30

सार्वजनिक ठिकाणी घाण करणे, थुंकणे, कचरा टाकणे, उघड्यावर लघवी करणे, शौच करणे या गोष्टी कायद्याने गुन्हा आहेत.

Careful ..! 32 lakh penalty in four months by people who spiting on roads | सावधान..!  रस्ते '' रंगवणाऱ्यां '' कडून चार महिन्यात ३२ लाखांचा दंड वसूल

सावधान..!  रस्ते '' रंगवणाऱ्यां '' कडून चार महिन्यात ३२ लाखांचा दंड वसूल

Next
ठळक मुद्देमहापालिका अधिका-यांकडून आचानक होऊ शकते आपल्या भागात कारवाई क्षेत्रिय कार्यालयाच्या कर्मचा-यांना अस्वच्छता पसरविणा-या नागरिकांवर कारवाई करण्याचे आदेशमहापालिकेच्या वतीने आता नियमितपणे अशी कारवाई करण्यात येणार

पुणे : गेल्या चार-पाच महिन्यांपासून महापालिकेकडून शहरामध्ये सार्वजनिक ठिकाणी घाण करणा-या, रस्त्यावर थुंकणे, लघवी करणे आणि कचरा टाकणा-यांवर कडक कारवाई सुरु आहे. सार्वजनिक ठिकाणी लघवी करणा-यांकडून आणि थुंकीबहाद्दरांकडून तब्बल ३१ लाख ५१ हजार ३२१ रुपयांचा दंड वसुल करण्यात आला आहे. ही कारवाई केवळ स्वच्छ सर्वेक्षणापुरती मयार्दीत नसून, यापुढे कायमस्वरुपी करण्यात येणार आहे. महापालिकेचे अधिकारी अचानकपणे शहराच्या कोणत्याही भागात कारवाई करणार आहेत.
    सार्वजनिक ठिकाणी घाण करणे, थुंकणे, कचरा टाकणे, उघड्यावर लघवी करणे, शौच करणे या गोष्टी कायद्याने गुन्हा आहेत. यासाठी केंद्र शासनाने महापालिकेला हे गुन्हे करणा-यांना शिक्षा करण्याचे अधिकार दिले आहेत. त्यानुसार महापालिकेच्या घनकचरा विभागाकडून कठोर कारवाई करण्यात येत आहे. यासाठी सर्व क्षेत्रिय कार्यालयाच्या कर्मचा-यांना अस्वच्छता पसरविणा-या नागरिकांवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सुरुवातीला नोव्हेंबर-डिंसेबर मध्ये काही प्रमाणात कारवाई करण्यात आली. परंतु त्यानंतर १ जानेवारी २०१९ पासून संपूर्ण शहरामध्ये नियमितपणे कडक कारवाई सुरु ठेवली आहे. 
----
कारवाई आता नियमितपणे
गेल्या चार-पाच महिन्यांपासून शहरामध्ये रस्त्यावर थुंकणे, लघवी करणे आणि कचरा टाकणा-यांवर कडक कारवाई करण्यात येत आहे. महापालिकेच्या वतीने आता नियमितपणे अशी कारवाई करण्यात येणार आहे.
- ज्ञानेश्वर मोळक, घनकचरा विभाग.
-----
गेल्या चार-पाच महिन्यांत शहरामध्ये करण्यात आलेल्या कारवाई
सार्वजनिक ठिकाणी थुंकणे : व्यक्ती १४०९ (१ लाख ८९ हजार ८४०), सार्वजनिक ठिकाणी लघवी करणे : व्यक्ती १४४ ( २५ हजार ७५५), सर्वाजनिक ठिकाणी कचार टाकणे :  व्यक्ती  १०४५५(२८ लाख ५५ हजार ४३१), एकूण : व्यक्ती १२०३३( ३१ लाख ५० हजार ३२१)

Web Title: Careful ..! 32 lakh penalty in four months by people who spiting on roads

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.