रुग्णवाहिका चालकाचा हलगर्जीपणा; वाहन मागे घेताना वृद्ध व्यक्तीस २ वेळा चिरडले, जुन्नरमधील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2023 01:35 PM2023-07-10T13:35:19+5:302023-07-10T14:13:10+5:30
जीवनदान देणाऱ्या रुग्णवाहिका चालकाने घेतले वृद्धाचे प्राण
ओतूर : लोकांना जीवनदान देणाऱ्या रुग्णवाहिका चालकाच्या हातून जीव घेतल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. जुन्नर येथील ओतूर बसस्थानकाच्या परिसरात डुंबरवाडी टोलनाक्यावर रुग्णवाहिका चालकाने वाहन पाठीमागे घेताना हलगर्जीपणा दाखवला असून एका वृद्ध व्यक्तीस दोन वेळा चिरडले. हि घटना सी सी टीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेत वृद्ध हे गंभीर जखमी झाले होते. पुणे येथील ससून रुग्णालयामध्ये उपचार घेत असताना त्यांचा मृत्यू झाला आहे. ही घटना दि.१ जुलै रोजी सायंकाळी ६:३० वाजण्या च्या सुमरास घडली.
रुग्णवाहिका चालकाचा हलगर्जीपणा; वाहन मागे घेताना वृद्ध व्यक्तीस २ वेळा चिरडले, जुन्नरमधील घटना#Pune#junnar#accidentpic.twitter.com/m2sF52Tf02
— Lokmat (@lokmat) July 10, 2023
या अपघातातील व्यक्तीचे नाव रज्जाक मुंढे (वय६५) रा. ओतूर ता. जुन्नर हे गंभीर जखमी झाल्यामुळे त्यांना चालकानी रुग्णवाहिकेने आळेफाटा येथील माऊली हॉस्पिटल मध्ये दाखल केले. मात्र त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुणे येथील ससून रुग्णालयात उपचार करण्यासाठी नेण्यात आले होते. परंतु उपचारादरम्यान त्यांचा ६ जून रोजी दुर्दैव मृत्यू झाला असल्याची माहिती रुग्णाच्या नातेवाईकांनी दिली. या अपघाताबाबत जमीर बाबुलाल मुंढे यांच्या फिर्यादीवरून रुग्णवाहिका चालक याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशी माहिती ओतूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सचिन कांडगे यांनी दिली.