मालवाहतुकदारांचे २० जुलैपासून चक्काजाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2018 01:39 AM2018-07-18T01:39:13+5:302018-07-18T01:39:15+5:30
आॅल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट कॉंग्रेसने २० जुलैपासून देशव्यापी चक्का जाम आंदोलनाची हाक दिली आहे.
पुणे : आॅल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट कॉंग्रेसने २० जुलैपासून देशव्यापी चक्का जाम आंदोलनाची हाक दिली आहे. त्या पार्श्वभूमीवर संघटनेच्या वतीने प्रादेशिक परिवहन विभाग (आरटीओ) आणि जिल्हाधिकाऱ्यांना बुधवारी (दि. १८) निवेदन देण्यात येणार आहे.
डिझेलची किंमत कमी करुन, देशभरातील डिझेल दर समान करावा, संपूर्ण देशात टोलमुक्ती करावी, थर्ड पार्टी इन्शुरन्स प्रीमियम कमी करावा, टीडीएस, प्राप्तीकर आणि ई वे बिलातील जाचक अटी वगळण्यात याव्यात, जड वाहनांना दोन चालकांची सक्ती करु नये अशा मागण्या केंद्र सरकारकडे करण्यात आल्या आहेत. आरटीओच्या आॅनलाईन प्रणालीमुळे होणाºया त्रासातून मालवाहतुकदारांची सुटका करावी, ट्रक, बस आणि टेम्पोसाठी पार्कींग टर्मिनन्स मिळावे, अशा विविध मागण्या राज्य सरकारकडे करण्यात आल्या आहेत, अशी माहिती महाराष्ट्र राज्य वाहन चालक मालक प्रतिनिधी महासंघाचे अध्यक्ष बाबा शिंदे यांना दिली.