वृक्षांचे संगोपन करणे ही काळाची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 04:08 AM2021-07-12T04:08:24+5:302021-07-12T04:08:24+5:30
कान्हूर मेसाई येथील मेसाई मंदिरासमोरील स्मशानभूमीत अखिल भारतीय ग्राहक पंचायत समितीच्या समूहाच्या वतीने या ...
कान्हूर मेसाई येथील मेसाई मंदिरासमोरील स्मशानभूमीत अखिल भारतीय ग्राहक पंचायत समितीच्या समूहाच्या वतीने या परिसरात वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी मध्य महाराष्ट्र प्रांत महसूल समिती प्रमुख रमेश टाकळकर, अखिल भारतीय ग्राहक पंचायत समितीचे शिरूर तालुकाध्यक्ष देवेंद्र जगताप, सचिव संतोष शिर्के, सहसंघटक पंडित मासळकर, कोषाध्यक्ष दत्तात्रेय ननवरे,दत्तात्रय शिंदे, भागाजी ननवरे, अक्षय कोंडेकर, ग्रामसेवक के बी घासले, विठ्ठल राव खर्डे, अजय खर्डे, दादा खर्डे, प्रल्हाद पुंडे, आरोग्य सेविका प्रियंका लंगे, मोहन पुंडे, आनंदा तळोले, बाळू लोखंडे, भरत गायकवाड तसेच आजी माजी ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.
वृक्षारोपण करताना सरपंच व अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे कार्यकर्ते.