बालमित्रांना ‘कार्निवल’ची मेजवानी!
By admin | Published: April 14, 2015 11:38 PM2015-04-14T23:38:55+5:302015-04-14T23:38:55+5:30
नाहीये ना! घाबरू नका रे, तुम्हा बालमित्रांच्या सुट्टीचे फुल टू प्लॅनिंग आणि धमाल घेऊन लोकमत बाल विकास मंच घेऊन आला आहे ‘
पुणे : परीक्षा संपली आता सुट्टीची चाहूल लागली. सुट्टीत धमाल करायचे पण कुठे जायचं आणि काय करायचे हे कळत नाहीये ना! घाबरू नका रे, तुम्हा बालमित्रांच्या सुट्टीचे फुल टू प्लॅनिंग आणि धमाल घेऊन लोकमत बाल विकास मंच घेऊन आला आहे ‘लोकमत किड्स कार्निवल २०१५’. धमाल, मजा-मस्तीचा आनंद आणि त्याबरोबरच वेगवेगळे वर्कशॉप असा दुहेरी संगम साधणारा हा किड्स कार्निवल बच्चे कंपनींची सुट्टी मजेशीर करणार आहे.
येत्या १५ एप्रिल ते १९ एप्रिल दरम्यान सकाळी ११ ते ९ या वेळेत या कार्निवलमध्ये चिमुकल्यांना सहभागी होता येणार आहे.कुमार पॅसिफीक मॉल, शंकरशेठ रस्ता, स्वारगेट येथे होणार आहे. यावेळी विविध वर्कशॉप घेण्यात येणार आहेत. यामध्ये डान्स, स्कील्स् डेव्हलपमेंट, कराटे/सेल्फ डिफेन्स, पेंटींग अॅन्ड क्ले मॉडेलिंग, गिटार अॅन्ड सिंथेसायझर, आर्ट अॅन्ड क्राफ्ट, मॅजिक ट्रीक्स, फोटोग्राफी अशा विविध प्रकारचे पाच दिवसांचे वर्कशॉप असणार आहे. मुलांना मौजमजा करण्याबरोबरच विविध कलागुण शिकण्याची संधी या वर्कशॉपमधून मिळणार आहे. याशिवाय शूटींग, आर्चरी, डार्ट, प्लेस्टेशन, बाऊंसी(कॅसल), वॉटरबॉल (वॉटर झॉर्बी), ट्रेन, बुल राईड, बन्जी जम्पींग अशा प्रकारे भरपूर खेळ ही खेळता येणार आहेत.
सध्या इंग्रजीच्या स्पेलींगमध्ये बरीच मोडतोड होताना दिसते. मुलांना योग्य स्पेलिंग माहित असावे या अनुषंगाने १६ एप्रिल रोजी ‘स्पेल बी’ ही स्पेलिंगशी निगडीत स्पर्धा होणार आहे तर याच दिवशी मुलांच्या बुद्धिमत्तेचा कस लावणारी ‘क्वीझ कॉन्टेस्ट’ ही होणार आहे.
नोंदणी आवश्यक
या कार्निवलमध्ये बालविकास मंचच्या सभासदांना ओळखपत्र दाखवून वर्कशॉपमध्ये मोफत प्रवेश मिळणार आहे. तर इतर चिमुरड्यांना सहभागी होण्यासाठी एका वर्कशॉपसाठी १०० रूपये नोंदणी फी राहणार आहे तर सर्व वर्कशॉपसाठी ५०० रूपये नोंदणी फी राहणार आहे. वर्कशॉपबरोबरच अनलिमिटेड खेळांचा आस्वाद घ्यायचा असेल तर त्यासाठी ५०० रूपये फी राहणार आहे.
छोटा भीम, चुटकी आणि भेटवस्तू
खेळ आणि वर्कशॉपबरोबरच मुलांना कार्टुन जगातील प्रसिद्ध छोटा भीम आणि चुटकी यांच्याबरोबरही धमाल करण्याची विशेष संधी मिळणार आहे. तसेच या कार्निवलमध्ये लहानग्यांसाठी लकी ड्रॉ ठेवण्यात आला आहे. दर तासाला एक लकी ड्रॉ काढला जाणार असून विजेत्याला गेमींग कुपन्स जिंकता येणार आहे.