भातपिकाच्या नुकसानीची कामे रोजगार हमी योजनेंर्तगत करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:14 AM2021-08-14T04:14:09+5:302021-08-14T04:14:09+5:30
या विषयाचे अनुषंगाने भोरच्या तहसीलदारांना लेखी निवेदन देण्यात आले आहे. तालुक्यातील ९४ गावांतील ३ हजार ९८० अतिवृष्टीमुळे नुकसान झाले ...
या विषयाचे अनुषंगाने भोरच्या तहसीलदारांना लेखी निवेदन देण्यात आले आहे. तालुक्यातील ९४ गावांतील ३ हजार ९८० अतिवृष्टीमुळे नुकसान झाले आहे. यात ७ हजार ५०० हेक्टर क्षेत्रातील भातपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. भातखाचराच्या तालींची पडझड झाली असून, लागवड झालेले भाताचे पीक वाहून गेले असल्याचे या वेळी मानसिंग धुमाळ यांनी सांगितले.
या वेळी भोर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक शंकर गुरव, दगडू दामगुडे, विजय धुमाळ, संतोष उफाळे, प्रकाश मोरे, नाना आखाडे, सर्जेराव पडवळ, केदार खोपडे आदी उपस्थित होते.
पंचनामे झाले, पुढे काय?
अतिवृष्टीने तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे. शासनाने पंचनामे केले. शासनाकडून किती नुकसान झाले आहे याची आकडेवारीही सांगितली आहे. मात्र शेतकऱ्यांना किती आणि कधी नुकसानभरपाई मिळणार हे मात्र आज तरी गुलदस्त्यातच असल्याचे पुणे जिल्हा परिषदेच्या माजी महिला व बालकल्याण समितीच्या सभापती वंदना धुमाळ यांनी सांगितले.