एक एकर ऊसपीक गेले वाहून , शेतकºयाचे नुकसान, ५० शेतक-यांना बसला फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2017 02:14 AM2017-09-16T02:14:28+5:302017-09-16T02:14:42+5:30
वालचंदनगर : रणगाव अंथुर्णे हद्दीत कमी क्षमतेचा बंधारा बांधण्यात आल्याने परिसरातील ५० शेतकºयांना फटका बसला आहे. अनंतराव सावंत यांच्या शेतीत बंधाºयाचे पाणी शिरल्याने १ एकर ऊस मातीसह वाहून गेल्याने लाखो रुपयांचा फटका बसला आहे.
काट्याची शेती म्हणून ओळखली जाणाºया ओढ्यावर गेल्या ६ महिन्यांपूर्वी बंधारा बांधण्यात आलेला आहे. हा बंधारा पाण्याची क्षमता लक्षात न घेताच बांधला असल्याची शेतकºयांची तक्रार आहे. या शेतकºयांना संबंधित अधिकाºयाने भरपाई द्यावी, अन्यथा संबंधित आमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आलेला आहे.
शेतकºयांच्या हितासाठी म्हणून कोल्हापुरी पद्धतीचा बंधारा बांधण्यात आलेला आहे. गेल्या पाच दिवसांपासून सतत मुसळधार पाऊस झाल्याने बंधारा पूर्ण क्षमतेने भरला. त्यामुळे तो पूर्वेकडील भागावर फुटला. त्याचे ओढ्याच्या पुरासारखे पाणी सावंत यांच्या शेतीतून वाहत आहे. संपूर्ण शेतीतील उसासह माती वाहून गेल्याने शेती होती का नव्हती, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. बंधाºयात पाणी थांबल्याने ५० शेतकºयांचा संपर्क तुटला आहे. मोठी हानी झाली आहे. त्यामुळेच नुकसानभरपाईची मागणी होत आहे.
लोकप्रतिनिधींना ना खेद ना खंत!
संबंधित शेतक-यांच्या शेतीचे नुकसान झाल्यानंतरदेखील कोणताही अधिकारी अथवा लोकप्रतिनिधी शेतकºयांच्या दु:खाचा विचार करत नसल्याने शेतकरी संतप्त झालेले आहेत. शेतातील मातीसह ऊस वाहून गेल्याने जमिनीची किंमत संबंधित अधिकाºयांनी द्यावी. शेतक-यांचा जाण्या-येण्याचा मार्ग बंद झाल्याने त्वरित उपाय करण्यात यावे. अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन व आमरण उपोषण करण्यात येणार असल्याचे अनंतराव सावंत यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.