पुण्यातील खेड शिवापूर टोल नाक्यावर कर्नाटकच्या गाड्यांची हवा सोडली

By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2022 06:47 PM2022-12-06T18:47:26+5:302022-12-06T18:47:36+5:30

गाड्यांवर जय महाराष्ट्र लिहून कन्नडिकांचा निषेध नोंदविण्यात आला

Cars from Karnataka left at Khed Sivapur toll booth in Pune | पुण्यातील खेड शिवापूर टोल नाक्यावर कर्नाटकच्या गाड्यांची हवा सोडली

पुण्यातील खेड शिवापूर टोल नाक्यावर कर्नाटकच्या गाड्यांची हवा सोडली

googlenewsNext

पुणे: कर्नाटक आणि महाराष्ट्र सीमावादाचे पडसाद आता महाराष्ट्रात उमटू लागले आहेत. कर्नाटकात झालेल्या उच्छादाला महाराष्ट्रातूनही प्रत्युत्तर दिले जात आहे. सकाळी पुणे शहरात शिवसेनेकडून कर्नाटकातील गाडयांना काळे फासण्यात आले होते. त्यानंतर खेड शिवापूर टोल नाक्यावर स्वराज्य संघटनेने आंदोलन केले आहे. स्वराजच्या कार्यकर्त्यानी कर्नाटकच्या गाड्यांची सोडली हवा सोडून निषेध नोंदवला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील खेड शिवापूर टोल नाक्यावर आज कर्नाटक मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे फोटो असणाऱ्या व एमएच १२ च्या गाड्यांची तोडफोड केल्याप्रकरणी खेड शिवापूर टोल नाक्यावर स्वराज्य संघटनेच्या वतीने जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले. स्वराज्य संघटनेने कन्नडिकांविरोधात जोरदार आंदोलन केले. कर्नाटकच्या गाड्यांची सोडली. तसेच कर्नाटकातील वाहनांवर स्वराज्य संघटनेचे स्टिकर लावण्यात आले. गाड्यांवर जय महाराष्ट्र लिहून कन्नडिकांचा निषेध नोंदविण्यात आला.

महाराष्ट्र गाड्यांवर जर कर्नाटकात हल्ला झाला तर... 

स्वारगेट डेपोजवळ उभ्या असलेल्या कर्नाटकच्या गाड्यांना काळं फासून त्यावर जय महाराष्ट्र लिहून निषेध नोंदविला. जर मराठी लोकांना किंवा महाराष्ट्राच्या गाड्यांना कर्नाटकात त्रास दिला तर आम्ही एकही कर्नाटकची गाडी येऊ देणार नाही असं आंदोलकांनी सांगितले. बेळगाव सीमेवर महाराष्ट्राच्या गाड्या कर्नाटकमधील नागरिकांनी फोडल्या असून आम्ही जशास तसं उत्तर देऊ, असंही यावेळी आंदोलकांनी सांगितले. अनेक आंदोलकांना पोलिसांनी यावेळी ताब्यात घेतलं आहे. स्वारगेट परिसरात कर्नाटकच्या गाड्या लावल्या जातात. तिथं जाऊन शिवसेना (उद्धव ठाकरे गट) कार्यकर्त्यांनी कर्नाटक सरकारचा जाहीर निषेध नोंदविला. महाराष्ट्र गाड्यांवर जर कर्नाटकात हल्ला झाला तर आम्ही शांत बसणार नाही, असंही यावेळी आंदोलक शिवसैनिकांनी प्रतिक्रिया दिली.

Web Title: Cars from Karnataka left at Khed Sivapur toll booth in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.