ठाण्यातील व्यंगचित्रकार संमेलनानिमित्त कार्टूनिस्ट कंबाईनच्या वतीने व्यंगचित्र स्पर्धा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2018 03:45 PM2018-01-02T15:45:58+5:302018-01-02T15:52:37+5:30
दि. २० आणि २१ जानेवारी दरम्यान होणाऱ्या मराठी व्यंगचित्रकार संमेलन २०१८साठी कार्टूनिस्ट्स कंबाईनच्यावतीने नवोदितांची व्यंगचित्र स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
पुणे : ठाणे येथे दि. २० आणि २१ जानेवारी दरम्यान होणाऱ्या मराठी व्यंगचित्रकार संमेलन २०१८साठी कार्टूनिस्ट्स कंबाईनच्यावतीने नवोदितांची व्यंगचित्र स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, गोवा, हैदराबाद आदी ठिकाणांवरून नवोदित चित्रकार, अव्यावसायिक व्यंगचित्रकार, व्यंगचित्रकार नसलेल्या व्यक्तींकडून मराठी व्यंगचित्रे मागवण्यात आली आहेत.
व्यंगचित्र स्पर्धेसाठी नेत्यांची वाढदिवस जाहिरातबाजी, टीव्ही मालिकांचा धुडगूस, जीवन व्यापलंय व्हॉट्स अॅपने हे विषय देण्यात आले आहेत. व्यंगचित्रे स्वरचितच असावी, एका स्पर्धकाने फक्त एक किंवा दोनच व्यंगचित्रे पाठवावीत. व्यंगचित्रांचा आकार ए फोर किंवा ए थ्री व फॉरमॅट जेपीजी किंवा टीफ्फ फाईल स्वरूपात असावा. निवड समिती व्यंगचित्राची निवड करेल. स्पर्धकाने स्वत: चा पत्ता, दूरध्वनी क्रमांक, इ-मेल पत्ता आणि व्हॉट्स अॅप क्रमांक (असल्यास) चित्रासोबत कळवावा. ई-मेल ऐवजी मूळ व्यंगचित्रे पोस्टाने पाठविताना पाकिटावर ‘व्यंगचित्र स्पर्धा’ असा स्पष्ट उल्लेख असावा. व्यंगचित्रे फक्त पोस्ट अथवा मेलवर पाठवावी. व्हाट्सअॅपवर पाठवलेली व्यंगचित्रे ग्राह्य धरली जाणार नाही. प्रस्थापित व्यंगचित्रकारांना या स्पर्धेसाठी भाग घेता येणार नाही. व्यंगचित्रे स्वीकारण्याची अंतिम तारीख ७ जानेवारी २०१८ आहे. त्यानंतर प्राप्त झालेल्या प्रवेशिका स्वीकारल्या जाणार नाहीत.
स्पर्धकांनी कार्टूनिस्ट्स कंबाईन, बी-४, कल्पतरु, रश्मी कॉम्प्लेक्स, मेंटल हॉस्पीटल रोड, ठाणे (पश्चिम) ४०००६०४ (मो. : ९८२१७३९३२७) अथवा cc18thane@gmail.com या पत्यावर व्यंगचित्रे पाठवावीत. अधिक माहितीसाठी महेंद्र भावसार ७०२१९६७५८७ किंवा रवींद्र बाळापुरे ७५०७३२९७२१ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.