रिंगरोड व रेल्वे विरोधातील ७ जणांवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 04:09 AM2021-07-01T04:09:15+5:302021-07-01T04:09:15+5:30

राजगुरुनगर : पुणे रिंगरोड आणि पुणे नाशिक रेल्वे मार्गाच्या जमीन संपादन प्रक्रियेला विरोध दर्शविण्यासाठी सुरू असलेल्या आंदोलन परवानगी नसल्याने ...

Case filed against 7 persons against Ring Road and Railway | रिंगरोड व रेल्वे विरोधातील ७ जणांवर गुन्हा दाखल

रिंगरोड व रेल्वे विरोधातील ७ जणांवर गुन्हा दाखल

googlenewsNext

राजगुरुनगर : पुणे रिंगरोड आणि पुणे नाशिक रेल्वे मार्गाच्या जमीन संपादन प्रक्रियेला विरोध दर्शविण्यासाठी सुरू असलेल्या आंदोलन परवानगी नसल्याने स्थगित करावे. असे पोलिसांनी सांगत पोलिसांनी ७ कार्यकर्त्यांविरोधात गुन्हे दाखल केले आहे.

अंदोलनाला कोरोनामुळे परवानगी नाही. या प्रकाराने आंदोलक आणि पोलिसांमध्ये शाब्दिक हुज्जत झाली. यामुळे आंदोलनस्थळी काही काळ तणावपूर्ण वातावरण होते. हे आंदोलन दडपण्याचा प्रकार होत असून असे घडल्यास प्रसंगी शेतकरी परिवारासह आत्मदहन करतील, असा इशारा खेड तालुका रिंगरोड व रेल्वे विरोधी शेतकरी कृती समितीचे अध्यक्ष पाटीलबुवा गवारी यांनी दिला.

कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी आंदोलन, मोर्चा यांना बंदी असतानाही जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशाचे उल्लंघन करून व कोरोना रूग्ण संख्येत वाढ होत आहे, हे माहीत असताना देखील बेकायदेशीररित्या प्रांत कार्यालयासमोर चक्री उपोषण केल्याप्रकरणी रविंद्र ज्ञानेश्वर कुऱ्हाडे, सुनिल विष्णू वरपे राहुल जनार्दन शिंदे, हरिभाऊ किसन खांदवे, संदिप दत्तात्रय लोखंडे, दत्तात्रय सोपान वरपे, रामदास काळूराम चौधरी यांचावर गुन्हा दाखल झाला आहे. तालुक्यातील १२ गावातून पुणे नाशिक रेल्वे आणि रिंग रोड प्रकल्प होणार आहे. या गावांच्या शेतकरी प्रतिनिधींनी मंगळवार (दि २९) पासून प्रांत कार्यालयासमोर ज्ञानेश्वरी वाचन करून चक्री उपोषण आंदोलन सुरू केले आहे. खालुंब्रे, निघोजे, कुरुळी, मोई, चिंबळी, केळगाव, आळंदी, चऱ्होली, धानोरे, सोळू, मरकळ आणि गोलेगाव या गावांचा त्यात समावेश आहे.

दडपशाहीचा विषयच नाही. या आंदोलनाला कोणतीही परवानगी नाही. कोविड स्थितीमुळे पाच जणांना आंदोलन स्थळी बसू दिले. आंदोलनस्थळी प्रांत कार्यालयासमोर मोठी गर्दी झाली होती. म्हणून पोलिसांनी हस्तक्षेप केला. आंदोलक पोलिसांवर आरडा ओरड करू लागले. कायद्याच्या चौकटीत राहून ७ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

.

सतिश गुरव, पोलीस निरीक्षक, खेड

आंदोलनकर्ते व पोलीस यांची काही काळ हुज्जत झाली.

Web Title: Case filed against 7 persons against Ring Road and Railway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.