चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपच्या प्रमुख नेत्यांवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 04:10 AM2021-03-23T04:10:26+5:302021-03-23T04:10:26+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : महाविकास आघाडी सरकाने राजीनामा द्यावा, या मागणीसाठी लोकमान्य टिळक चौकात बेकायदेशीरपणे आंदोलन करणाऱ्या भाजपचे ...

Case filed against BJP leaders including Chandrakant Patil | चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपच्या प्रमुख नेत्यांवर गुन्हा दाखल

चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपच्या प्रमुख नेत्यांवर गुन्हा दाखल

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : महाविकास आघाडी सरकाने राजीनामा द्यावा, या मागणीसाठी लोकमान्य टिळक चौकात बेकायदेशीरपणे आंदोलन करणाऱ्या भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह प्रमुख नेत्यांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

आमदार चंद्रकांत पाटील, माजी आमदार व शहराध्यक्ष जगदीश मुळीक, योगेश टिळेकर, राजेश पांडे, गणेश घोष, राजेश येनपुरे, सुशील मेंगडे, संदीप खेडेकर, धीरज घाटे, दीपक पोटे, वर्षा तापकीर, कल्पना पुरंदरे, अर्चना पाटील यांच्यासह ४० ते ५० लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर आरोप केले आहेत. त्यामुळे ठाकरे सरकारने राजीनामा द्यावा, या मागणीसाठी भाजपच्या कार्यकर्त्यांनी टिळक चौकात रविवारी आंदोलन केले होते. विनापरवाना एकत्र जमून राज्य शासनाचे प्रतिबंधात्मक आदेश असताना त्याचे उल्लंघन करून कोरोना संसर्गजन्य रोगांचा प्रादुर्भाव रोखण्याची खबरदारी न घेता जाणूनबुजून आपल्या व इतरांच्या जीवितास धोका निर्माण होईल असे घातक कृत्य करुन शासनाच्या धोरणाविरोधात निषेधाच्या घोषणा देण्यासाठी बेकायदेशीरपणे गर्दी केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Case filed against BJP leaders including Chandrakant Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.